For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Crime | अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीस २० वर्षाची सक्तमजूरीची शिक्षा!

12:30 PM Apr 30, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur crime    अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीस २० वर्षाची सक्तमजूरीची शिक्षा
Advertisement

                 अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षांची शिक्षा

Advertisement

घुणकी - दि 29.किणी( ता. हातकणंगले )येथील चांदोली वसाहतीत राहणाऱ्या 39 वर्षीय पंकज सावळा घोलप याला जलदगती न्यायालयाने दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी धरून वीस वर्षे सक्त मजुरीची शिक्षा आणि एक हजार रुपये दंड ठोठावला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की पंकज सावळा घोलप यान 2021 आणि 2022 साली आपल्या घरातच दोन अल्पवयीन मुलींना आमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना घडली होती.

याबाबतची तक्रार पिडी तेच्या आईने पेठ वडगाव पोलीस ठाण्यात दिली होती. याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीशसो ४ तथा फास्ट ट्रक स्पेशल,पोक्सो कोर्ट, कोल्हापूर न्यायाधीश एस एस तांबे यांच्या कोर्टामध्ये सुरू होती. सरकारी वकील म्हणून एड अमिता एस कुलकर्णी यांनी काम पाहिले. तर तपास अधिकारी म्हणून पेठवडगाव पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक अर्चना पाटील, अधिकारी म्हणून विशाल पाटील यांनी काम पाहिले.

Advertisement

सरकारी पक्षातर्फे 11 साक्षीदार तपासले. न्यायालयाने अकराही साक्षीदारांचे साक्ष ग्राह्य धरल्या.पुरावे तसेच परीस्थितीजन्य हा सबळ पुरावा ग्राहय मानून तसेच सरकारी वकील अॅड. अमिता ए. कुलकर्णी यांनी केलेला विस्तृत युक्तीवाद तसेच मा. सर्वोच्च न्यायालय व मा. उच्च न्यायालय येथील सादर केलेले दाखले ग्राहय मानून प्रस्तूत प्रकरणी माननीय . न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवून वीस वर्षाची सक्तमजूरीची शिक्षा व एक हजार रुपये दंड, दंड न भरलेस तिन महीन्याची साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली.

तसेच कोर्टाने दोन्ही पिडीत मुलींना विधी सेवा प्राधिकरणा मार्फत नुकसान भरपाई देण्याचा आदेश पारित केला आहे. या पीडीतांना योग्य न्याय मिळाल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारी वकील, तपास अधिकारी यांचे कौतुक होत आहे.

Advertisement
Tags :

.