For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आसाम बलात्कार घटनेतील आरोपी ठार

06:03 AM Aug 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
आसाम बलात्कार घटनेतील आरोपी ठार
Advertisement

वृत्तसंस्था / गुवाहाटी

Advertisement

आसामच्या नौगाव जिल्ह्यातील धिंग येथे 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्काराच्या प्रकरणातील एक आरोपी ठार झाला आहे. त्यांने शनिवारी पोलिसांच्या तावडीतून पळ काढण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात तो तळ्यात पडला आणि त्याचा मृत्यू झाला. या बलात्कार प्रकरणात तीन संशयित असून अद्याप दोघांना अटक व्हायची आहे. ठार झालेल्या आरोपीचे नाव तफझ्झुल इस्लाम असल्याची माहिती देण्यात आली. अन्य दोन आरोपींचा शोध घेतला जात आहे.

या तीन आरोपींनी ही युवती शिकवणीहून परत येत असताना तिचे अपहरण करुन सामुहिक बलात्कार केला होता. या अत्याचारामुळे युवती बेशुद्ध पडली. आरोपींनी तिला तळ्याच्या काठी टाकले होते. पोलिसांनी त्वरित एका आरोपीस अटक केली होती. या आरोपीला घेऊन पोलिस तळ्याकडे तपासासाठी आले असताना त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. तथापि, त्याचा पाय घसरुन तो तळ्यात पडला आणि बुडून ठार झाला, अशी माहिती देण्यात आली.

Advertisement

उपचार सुरु

बलात्कार पिडीत युवतीवर नौगाव येथे उपचार होत आहेत. तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणात तिचा जबाब महत्वाचा ठरणार असून तो नोंदवून घेतल्यानंतर तपासाला गती मिळणार आहे. या युवतीला पोलिसांचे संरक्षण देण्यात आले असून तिची वैद्यकीय तपासणीही लवकरच केली जाणार आहे. आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी तिच्या मातापित्यांनी केली असून या बलात्कार घटनेमुळे संतापाची लाट उसळली आहे.

Advertisement
Tags :

.