For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अबुधाबीला निघालेला आरोपी विमानातच केला जेरबंद

10:46 AM Jul 10, 2025 IST | Radhika Patil
अबुधाबीला निघालेला आरोपी विमानातच केला जेरबंद
Advertisement

महाबळेश्वर :

Advertisement

येथील ऑक्सिजन या बंद हॉटेलच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या वॉचमनने भंगार व्यवसायिकांच्या मदतीने हॉटेलमधील दहा लाख रूपयांच्या मालाची नियोजनबद्ध चोरी केली. चोरीतुन मिळालेली रक्कम घेवुन अबुधाबी येथे पळुन निघालेल्या वॉचमनला महाबळेश्वर व सातारा गुन्हे अन्वेशन विभागाच्या पोलीस अधिकारी यांनी फिल्मी स्टाईलने तपास करून कांचन बॅनर्जी रा. मुंबई या मुख्य आरोपीस मुंबई येथुन विमानातुन ताब्यात घेतले. तसेच त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे सैदापुर (ता. सातारा) येथुन करण घाडगे व गौतम घाडगे अशा तीन आरोपीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. या चोरीत सहभागी असलेल्या इतर सहा आरोपीचा तपास सुरू आहे.

बंद असलेल्या हॉटेलच्या सुरक्षा रक्षक कांचन बॅनर्जी याने सातारा सैदापुर येथील भंगार विक्रेत्याशी संपर्क साधुन हॉटेलमधील भंगार विकायचे आहे असे सांगितले. भंगारवाले करण घाडगे व गौतम घाडगे हे सुरक्षा रक्षकाने दिलेल्या पत्यावर पोहोचले. तेथे त्यांनी 22 व 23 जुन रोजी सर्व साहित्य हे खोलुन ठेवुन व्यवस्थित बांधुन ठेवले. यामध्ये एसी, टिव्ही संगणक याबरोबरच विविध प्रकारचे फर्निचर, किचनमधील भांडी असे साधारण दहा लाखांच्या साहित्याचा समावेश आहे. बांधुन ठेवलेले साहित्य घेवुन जाण्यासाठी दोन ट्रक घेवुन आरोपी हे 25 जुन रोजी पुन्हा हॉटेल ऑक्सीजनमध्ये पोहोचले बांधुन ठेवलेले सर्व साहित्य दोन ट्रकमध्ये भरून सर्वजण पसार झाले.
सुरक्षा रक्षकाबरोबर संपर्क होत नसल्याने हॉटेलचे मालक विशाल तोष्णीवाल व संतोष शिंदे हे हॉटेलवर पोहोचले तेव्हा आपल्या हॉटेलचा सुरक्षा रक्षक गायब असल्याचे व आपल्या हॉटेलमधील साहित्याची चोरी झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने महावळेश्वर पोलिसात चोरीची तक्रार दिली. महाबळेश्वरचे पोलिस निरीक्षक बापुसाहेब सांडभोर हे वारीच्या बंदोबस्तावर होते. जिल्हा पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांनी तातडीने महाबळेश्वरचे पोलीस निरीक्षक यांना ताताडीने महाबळेश्वर येथे पोहोचण्याचे आदेश दिले. उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेव भालचिम व पोलीस निरीक्षक सांडभोर यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. सातारा येथील श्वान पथक व हस्तरेषा तज्ञाचे पथक देखिल हॉटेलवर पोहोचले.

Advertisement

पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांनी केलेल्या मार्गदर्शनाखाली महाबळेश्वर व सातारा पोलिसांनी चोरीचा वेगाने तपास केला. या चोरी प्रकरणाचा मुख्य सुत्रधार कांचन बॅनर्जी हा नोकरीसाठी अबुधावी येथे जाणार होता. पोलिसांनी त्याचे मोबाईल लोकशनच्या आधारे त्याची माहिती मिळविली तेव्हा तो मुंबई येथील वसई विभागात असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांचे 5 जुन रोजी रात्री एक पथक तातडीने वसईकडे तर दुसरे मुंबई विमानतळाकडे रवाना झाले. वसईमधील टॉवर लोकेशनच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. तेव्हा बॅनर्जी याचा मोबाईल बंद झाला आणि पोलिसांच्या तपासात अडथळे आले. पुन्हा मोबाईलचे लोकशन मुंबई विमानतळ आले. त्यानुसार पोलिसांनी पोलिसांनी सिने स्टाईल तपास सुरू केला तर आरोपी हा विमानात बसलेला आढळला. सातारा व महाबळेश्वर पोलिसांनी विमानतळ सुरक्षा यंत्रणे बरोवर संपर्क साधला, परंतु सातारा पोलिसांना प्रतिसाद मिळाला नाही. तेव्हा मुंबई पोलीस विभागाशी संपर्क केला तेव्हा पुन्हा वेगाने सुत्रे हलली विमानात बसलेला सुरक्षा रक्षक बॅनर्जी यास पोलिसांनी ताब्यात घेतले.

बॅनर्जी याच्याबरोवर पोलीस चर्चा करीत होते परंतु तो काही सांगत नव्हता परंतु गाडी जशी पुणे सोडुन साताराच्या दिशेन निघाली तेव्हा आरोपीने तेंड उघडण्यास सुरूवात केली. सुरक्षा रक्षकाने चोरीची कबुली दिली व चोरीमध्ये कोण कोण सहभागी आहे याची सर्व माहिती दिली. साहित्य कुठे आहे त्याची ही माहिती पोलिसांनी मिळाली. सुरक्षा रक्षकाने दिलेल्या माहितीच्या आधारे सैदापूर सातारा येथून करण घाडगे व गौतम घाडगे या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. याच ठिकाणावरून पोलिसांनी चोरीला गेलेल्या मालापैकी काही माल हस्तगत केला. उरलेल्या साहित्याचा काही तपास लागत नव्हता. अखेर पोलिसांना आपल्या पद्धतीने चौकशी केली तेव्हा सर्व आरोपींनी आपले तोंड उघडले. भंगार व्यावसायिकाच्या गोडाऊनमधून पोलिसांनी इतर सर्व साहित्य हस्तगत केले.

पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, महाबळेश्वरचे पोलीस निरीक्षक बापुसाहेब सांडभोर, सहायक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, परितोष दातीर, महिला पोलीस उपनिरीक्षक रुपाली काळे, पोलीस उपनिरीक्षक रौफ इनामदार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार विश्वनाथ संकपाळ, अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, लैलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, अमित माने, प्रविण कांबळे, अविनाश चव्हाण, मुनीर मुल्ला, शिवाजी भिसे, अरुण पाटील, अमित झेंडे, अजय जाधव, गणेश कापरे, प्रमोद सावंत, अमोल माने, स्वप्नील कुंभार, अजित कर्णे, राकेश खांडके, सनी आवटे, अमित सपकाळ, हसन तडवी, राजू कांबळे, मोहन पवार, ओकार यादव, सचिन ससाणे, पृथ्वीराज जाधव, रविराज वर्णेकर, रोहित निकम, प्रविण पवार, विशाल पवार, संकेत निकम, स्वप्नील दौंड, शिवाजी गुरव, पंकज बेसके, अमृत करपे, संभाजी साळुंखे, विजय निकम, महाबळेश्वर पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार जितेंद्र कांबळे, नवनाथ शिंदे, सलिम सय्यद यांनी सहभाग घेतला असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी अभिनंदन केले आहे.

Advertisement
Tags :

.