For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Crime : अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याप्रकरणी आरोपी अटकेत

05:30 PM Feb 04, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur crime   अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याप्रकरणी आरोपी अटकेत
Advertisement

                           हुपरी पोलीसांनी तांत्रिक तपासाद्वारे आरोपीचा शोध घेतला

Advertisement

हुपरी : लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीस बिबाहित तरुणाने पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केला याप्रकरणी हुपरी पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्ह्याखाली तरुणास अटक केली आहे. सनी साताप्पा कांबळे (वय २८, रा. कारदगा, ता. निपाणी, जि. बेळगाव) असे संशयिताचे नाब आहे. त्याला इचलकरंजी न्यायालयासमोर उभे केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

पीडित अल्पवयीन मुलगी ही आपल्या आई-वडिलांसोबत हातकणंगले तालुक्यातील एका गावात वास्तव्यास होती. क्रशरवर डंपर चालक म्हणून सनी कांबळे काम करत होता. त्यावेळी पीडित मुलीशी ओळख झाली. यातून संशयिताने लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. आरोपीचे लग्न झाले असून त्याला सहा महिन्याचे लहान मूल आहे. असे असताना त्या आरोपीने कर्नाटक (मंड्या) आणि पंढरपूर (जि. सोलापूर) येथील पांढरवाडी येथे नेऊन ठेवले होते. एका झोपडीमध्ये तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचे तपासात समोर आले आहे.

Advertisement

कोल्हापूर येथील पथकाने तांत्रिक तपासाद्वारे आरोपीचा शोध घेतला आणि पीडितेसह ताब्यात घेतले. याप्रकरणी हुपरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण २०१२च्या कायद्यानुसार पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अटक करून इचलकरंजी न्यायलयासमोर हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक एन. आर. चौखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रसाद कोळपे तपास करीत आहेत.

Advertisement
Tags :

.