For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur Crime | १२ वाजून ३५ मिनिटांची 'ती' वेळ आणि एका क्षणात.....; पोलिसांच्या गराड्यातून आरोपी कसा झाला फरार?

03:10 PM Jun 11, 2026 IST | NEETA POTDAR
solapur crime   १२ वाजून ३५ मिनिटांची  ती  वेळ आणि एका क्षणात       पोलिसांच्या गराड्यातून आरोपी कसा झाला फरार
Advertisement

Advertisement

मंगळवेढा - मंगळवेढा येथील सबजेलमधून न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी महेश बिराप्पा बंडगर (रा. शिराढोण, राज्य कर्नाटक) हा मंगळवारी सबजेलमधून पळून गेल्याची घटना घडली.या प्रकरणी त्याच्या विरुध्द मंगळवेढा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गार्डवर तीन पोलीस कर्मचारी असताना कर्तव्यात कसूर केलेल्या त्या कर्मचाऱ्यावर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आता नेमकी काय कारवाई करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

आरोपी महेश बंडगर हा मंगळवेढा पोलीस ठाणे बी.एन.एस. कलम ११८ (२), ३५२ प्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल होता. सध्या हा आरोपी न्यायालयीन कोठडीत असताना मंगळवार, ९ जून रोजी भरखुपारी १२.३५ वाजता न्यायालयीन कोठडीतील सबजेल कायदेशीर रखवालीतून स्थानबध्द असतानानजर चुकवून तो फरार झाला असल्याचे पोलीस अंमलदार अमर नकाते यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास अ पोलीस हवालदार दत्तात्रय व्हरे हे करीत आहेत. दरम्यान, सबजेलमधून भरदिवसा आरोपी गार्डवर तीन पोलीस कर्मचारी असताना कसा काय पळून गेला, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. आरोपी पळून जाताच पोलीस दलात मोठी खळबळ उडाली. याची माहिती मीडियापर्यंत पोहचू नये याची कटाक्षाने काळजी पोलीस प्रशासनाने घेतली होती. प्रसार माध्यमांनी याबाबत माहिती विचारली असता अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांनी हात झटकले. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर याबाबत सविस्तर माहिती मिळाली आहे. कारागृहामध्ये आरोपींना जेवणाचे डब्बे खासगी व्यक्ती पुरवत असताना आरोपी या संधीचा फायदा घेऊन फरार झाल्याची चर्चा परिसरात दिवसभर सुरु होती.

Advertisement

आगीतून उठून फुफूट्यात पडल्याचा प्रकार....

नवीन तहसील कार्यालयात लाखो रुपये खर्च करून सुरक्षितरीत्या सबजेल बांधण्यात आले आहे. येथे काही दिवस आरोपी सुरक्षित होते. पळून जाण्याचा प्रकार कधीच घडला नाही. तेथे सुविधाही सगळ्या असताना कोणाच्या आशीर्वादाने तेथील आरोपी जुन्या तहसील कार्यालयाच्या आवारात असलेल्या कौलारु सबजेलमध्ये आणून ठेवले. यापूर्वीही दोन वेळा आरोपी येथून पळून गेले होते. याचा वाईट अनुभव असतानाही पुन्हा येथे आरोपी का आणले, असा संतापजनक सवाल जेलर व पोलीस प्रशासनास विचारला जात आहे.

नवीन तहसील कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे असल्यामुळे कोणताही गैर प्रकार तेथे भीतीपोटी घडत नव्हता. जुन्या तहसील कार्यालय परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे गैरप्रकार घडत असल्याचाही आरोप नागरिकांमधून होत आहे. पोलीस अधिकारी अतुल कुलकर्णी हे गार्डवर असलेल्या तीन कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्याने त्यांच्यावर आता नेमकी काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. पोलिसांचे पथकाने कर्नाटकमध्ये आरोपीचा शोध घेतला असता तो मिळून आल्याचे सांगण्यात आले.

Advertisement
Tags :

.