For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘जय महाराष्ट्र’ प्रकरणी म. ए. समिती कार्यकर्त्यांवर दोषारोप

06:36 AM Oct 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘जय महाराष्ट्र’ प्रकरणी  म  ए  समिती कार्यकर्त्यांवर दोषारोप
Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या (एसटी) नव्या बसवर ‘जय महाराष्ट्र’ लिहिण्याच्या निर्णयानंतर बेळगावमध्ये दाखल झालेल्या बसचे स्वागत करण्यात आले होते. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांवर न्यायालयात दोषारोप निश्चित करण्यात आले.

2017 मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एक आदेश काढून महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या प्रत्येक नवीन बसवर जय महाराष्ट्र लिहिण्याचा आदेश काढला. कर्नाटकाचे तत्कालीन नगरविकास मंत्र्यांनी कर्नाटकात जय महाराष्ट्र म्हणण्याबाबत आक्षेप घेतला होता. याला प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्र परिवहन मंडळाने हा आदेश काढला होता.

Advertisement

जय महाराष्ट्र लिहिलेली बस सर्वप्रथम बेळगाव बसस्थानकात दाखल होताच म. ए. समितीचे मदन बामणे, गणेश द•ाrकर, सूरज कणबरकर, मेघन लंगरकांडे यांनी त्या बसचे स्वागत केले व जय महाराष्ट्रच्या घोषणाही दिल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यासह बसचे चालक देविदास बोराट व वाहक प्रमोद गायकवाड यांच्यावरदेखील मार्केट पोलीस स्थानकामध्ये भा. दं. स. कलम 143, 147, 153 (अ) व सहकलम 149 प्रमाणे गुन्हा दाखल केला. यापैकी म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांवर दोषारोप निश्चित करण्यात आले आहेत.

Advertisement
Tags :

.