For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Abhijeet Dipake Beaten in Jaipur कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना जयपूर आंदोलनादरम्यान मारहाण...व्हिडिओ व्हायरल

05:20 PM Jun 15, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
abhijeet dipake beaten in jaipur कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना जयपूर आंदोलनादरम्यान मारहाण   व्हिडिओ व्हायरल
Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार जयपूर येथे आंदोलनादरम्यान कॉक्रोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजीते दिपके यांना मारहाण करण्यात आली आहे. राजस्थानमधील जयपूर येथे नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ तसेच केंद्रिय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्याची मागणी करणारे आंदोलन जयपूर येथे सुरु असताना ही घटना घडली.

Advertisement

याप्रकरणी व्हायरल व्हिडीओमध्ये अभिजीत दीपके यांना कॉक्रोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलून घेतल्यानंतर अचानक एका तरुणाने दीपके यांच्या कानशिलात लगावल्याचे दिसत आहे.

पोलिसांचा बंदोबस्त असतानाही कॉक्रोच जनता पार्टीच्या विरोधात एक गट तिथं आधीपासून हजर होता. आंदोलनावेळी जयपूरमध्ये सीजेपीचे समर्थक आणि विरोधक एकमेकांसमोर उभे ठाकल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता. हा हल्ला कुणी केला? यामागे कोण आहे याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. पण सध्या अभिजीत दीपके सुरक्षित आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.