महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

तीन भारतीय विद्यार्थ्यांचा अमेरिकेत अपघाती मृत्यू

06:11 AM May 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दुर्घटनेतील जखमींवर उपचार सुरू

Advertisement

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

Advertisement

अमेरिकेच्या जॉर्जिया प्रांतात एक भीषण रस्ते अपघात झाला आहे. या दुर्घटनेत 3 भारतीय विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. भरधाव वेगामुळे कार पलटून दुर्घटनाग्रस्त झाली. श्रीया अवसरला, अन्वी शर्मा, आर्यन जोशी अशी मृतांची नावे आहेत. तिघांचेही वय 18 वर्षे होते असे सांगण्यात आले.

मॅक्सवेल रोडच्या उत्तर दिशेला असलेल्या वेस्टसाइड पार्कवेवर कार चालवताना ही दुर्घटना घडली आहे. आर्यन जोशीने अलिकडेच अल्फारेटा हायस्कूलमध्ये स्वत:चे सीनियर ईयर पूर्ण केले होते. तर श्रीया आणि अन्वी या जॉर्जिया विद्यापीठात प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनी होत्या. जखमींमध्ये जॉर्जिया विद्यापीठात शिकणारा रितवाक सोमपल्ली आणि अल्फारेटा हायस्कूलचा विद्यार्थी मोहम्मद लियाकाथ यांचा समावेश आहे. रितवाक संबंधित कार चालवत होता. दुर्घटनेचे मुख्य कारण भरधाव वेग असू शकते. अचूक कारण जाणून घेण्यासाठी तपास केला जात आहे. कारचालकाने नियंत्रण गमावल्याने ही दुर्घटना घडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article