For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Shirala Accident | कुटुंबाला भेटून आनंदात निघाला, पण मांगले-काखे रस्त्यावर दबा धरून बसला होता काळ; ३१ वर्षीय तरुणाच्या मृत्यूने शिराळा हादरलं!

05:16 PM Jun 03, 2026 IST | NEETA POTDAR
shirala accident   कुटुंबाला भेटून आनंदात निघाला  पण मांगले काखे रस्त्यावर दबा धरून बसला होता काळ  ३१ वर्षीय तरुणाच्या मृत्यूने शिराळा हादरलं
Advertisement

                                        शिराळा-मांगले मार्गावर अपघात;

Advertisement

शिराळा : शिराळा येथील नवजीवन वसाहत येथील सध्या राहणार कारदगा (ता. चिकोडी, जि. बेळगाव) येथे वास्तव्यास असलेल्या एका ३१ वर्षीय तरुणाचा रस्ता अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अरविंद रामचंद्र जाधव असे या मृत तरुणाचे नाव असून याप्रकरणी मांगले येथील गॅस एजन्सीच्या अज्ञात वाहनचालकाविरुद्ध शिराळा पोलीसात गुन्हा दाखल केला आहे.

शिराळा पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद जाधव हा आपल्या कुटुंबासह सध्या कारदगा येथे राहत होता. तेथे चालक म्हणून काम करत होता. ११ मार्च रोजी दुपारी तो आपल्या दुचाकीवरून शिराळा येथे आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आला होता.रात्री पावणेआठच्या सुमारास | तो शिराळा येथून पुन्हा कारदगाकडे जाण्यासाठी निघाला असता मांगले काखे रस्त्यावरील आर. सी. हॉटेलपासून काही अंतरावर एका स्थानिक गॅस एजन्सीच्या वाहनावरील अज्ञात चालकाने रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लभकरून आपले वाहन निष्काळजीपणे रिव्हर्स (मागे) घेतले.

Advertisement

जोरदार आणि याच दरम्यान या वाहनाने अरविंदच्या दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात अरविंदच्या डोक्याला हातापायाला गंभीर दुखापत झाली. अपघात घडल्यानंतर संशयित चालक जखमीला वैद्यकीय मदत न वाहन घेऊन घटनास्थळावरून पसार झाला. अपघाताची माहिती मिळताच जखमी अरविंदचे वडीलरामचंद्र जाधव, भाऊ आणि मित्रांनी घटनास्थळी धाव घेतली. १०८ रुग्णवाहिकेच्या सहाय्याने त्याला कोल्हापूर येथे नेण्यात आले. मात्र, तेथे व्हेंटिलेटर बेड उपलब्ध न झाल्याने उपचारासाठी कदमवाडी येथे एका रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल केले. अरविंद यांने तेथे सलग सात दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर १८ मार्च रोजी सकाळी उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

धार्मिक विधी आटोपल्यानंतर मृत तरुणाचे वडील रामचंद्र शिवाजी जाधव रा. नवजीवन वसाहत, शिराळा यांनी शिराळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या वर्दीजबाबावरून मांगले येथील गॅस एजन्सीच्या अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला.

Advertisement
Tags :

.