For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Pandharpur News : पंढरपूर-तिहे रस्त्यावर अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार

06:02 PM Jan 07, 2026 IST | NEETA POTDAR
pandharpur news   पंढरपूर तिहे रस्त्यावर अपघात  दुचाकीस्वार जागीच ठार
Advertisement

                       सुस्ते गावाजवळ एसटी व दुचाकीची धडक

पंढरपूर : पंढरपूर-ति-हे रस्त्यावरील सुस्ते गावाजवळ एसटी व दुचाकीची धडक होऊन दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना मंगळवारी सकाळी सहा वाजता घडली. औदुंबर सालविठ्ठल (वय ५८, रा. सुस्ते, ता. पंढरपूर) असे शेतकऱ्याचे नाव आहे.

Advertisement

औदुंबर सालविठ्ल हे शेतातील भाजीपाला मार्केट यार्डमध्ये विकून गावाकडे येत होते. मात्र दाट धुके आणि एसटी बसला (एम एच ०७-९०२१) एकच लाईट असल्याने त्यांना त्याचाअंदाज आला नाही.  त्यामुळे ते एसटीला धडकले. त्यामध्ये तयांचा मृत्यू झाला. सालविठ्ठल यांचे घर अपघात स्थळापासून अवघ्या एक किमी अंतरावर होते.याची नोंद तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.