Miraj News | मिरज-बोलवाड रस्त्यावर अपघात; दुचाकीस्वार गंभीर जखमी
05:51 PM Jun 03, 2026 IST | NEETA POTDAR
Advertisement
भरधाव टेंपोची दुचाकीला धडक
Advertisement
मिरज : येथील बोलवाड रस्त्यावर भरधाव भरधाव टेंपोने धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार मौला बाळूशेख (वय ६०, रा. बोलवाड) हे जखमी झाले. याबाबत त्यांचा भाचा अमित खुदबुद्दीन मुजावर (वय ३८) यांनी मिरज शहर पोलिसात तक्रार दिली आहे.अनोळखी टेंपो चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.
मौला शेख हे दुचाकी (एमएच-१०-बीटी-४३४२) ने मिरज-बोलवाड रस्त्याने जात होते. वेळी अनोळखी टेंपो चालक (एमएच-१०-डीटी-७१९१) ने भरधाव वेगात धडक दिली. या अपघातात मौला शेख हे जखमी झाले. स्थानिकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले.
Advertisement
Advertisement