For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur Accident: डंपरच्या धडकेत तीन मजुर जागीच ठार, मुस्ती-धोत्री रस्त्यावरील घटना

03:16 PM Jun 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
solapur accident  डंपरच्या धडकेत तीन मजुर जागीच ठार  मुस्ती धोत्री रस्त्यावरील घटना
Advertisement

मुस्ती-धोत्री रस्त्यावरील पाझर तलाव जवळील वळणावर हा अपघात झाला

Advertisement

सोलापूर : डंपरने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत मोटरसायकलवरील तिघे मजुर ठार झाल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. मुस्ती-धोत्री रस्त्यावरील पाझर तलाव जवळील वळणावर हा अपघात झाला. या अपघातात एकाच गावातील तिघांचा मृत्यू झाल्याने मुस्ती गावावर शोककळा पसरली आहे.

या अपघातात देविदास मारुती दुपारगुडे (वय ३२), नितीन शाम वाघमारे (वय ३५), हनुमंता गोपीनाथ पवार (वय ४० रा. तिघेही मुस्ती ता. दक्षिण सोलापूर) अशी ठार झालेल्या तीन मजुरांची नावे आहेत. याबाबत माहिती अशी की, यातील मुस्ती येथील तिघेजण मोटरसायकलवरून धोत्री (ता.दक्षिण सोलापूर) या गावाकडे मजुरीचे काम करण्यासाठी म्हणून जात होते.

Advertisement

धोत्रीकडून मुस्ती गावाकडे माती भरण्यासाठी भरधाव वेगात डंपर जात होता. हे वाहन मुस्ती पाझर तलाव क्रमांक एक जवळील वळणावर येताच डंपरने मोटरसायकलला समोरून जोराची धडक दिली. यात तिघेही मोटरसायकलवरून रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात पडले.

तिघांच्याही डोक्याला गंभीर मार लागल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघात घडताच डंपरच्या चालकाने डंपर न थांबवता तसाच निघून गेला. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनी सोलापुरातील सीविल हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी केली होती.

Advertisement
Tags :

.