महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

केनियन लष्करप्रमुखांसह 10 जणांचा अपघाती मृत्यू

06:34 AM Apr 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त : केनियात 3 दिवसांचा दुखवटा

Advertisement

वृत्तसंस्था/ नैरोबी

Advertisement

केनियातील एका हेलिकॉप्टर अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये केनियाचे लष्करप्रमुख जनरल फ्रान्सिस ओमोंडी ओगोला यांच्यासह अन्य लष्करी अधिकारी-सैनिकांचा समावेश आहे. या घटनेबाबत तीव्र शोक व्यक्त करत राष्ट्रपती विल्यम ऊटो यांनी देशात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. ओगोला नैरोबीहून देशाच्या उत्तरेकडील भागातील सैनिकांना भेटण्यासाठी आणि शाळेच्या नूतनीकरण कामाची पाहणी करण्यासाठी निघाले होते. उ•ाणानंतर काही वेळातच त्यांचे हेलिकॉप्टर कोसळले. या घटनेनंतर राष्ट्रपतींनी नैरोबी येथे देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलावली होती. तसेच अपघाताच्या तपासासाठी विशेष पथकही घटनास्थळी रवाना झाले होते.

जनरल फ्रान्सिस ओमोंडी ओगोला यांच्या निधनाची घोषणा करताना मला अत्यंत दु:ख होत आहे. अपघाताचे कारण शोधण्यासाठी एक पथक तयार करण्यात आले आहे. अल्गेयो माराकवेट परगण्यात घडलेल्या अपघातस्थळी एक विशेष पथक पाठवण्यात आले आहे, असेही राष्ट्रपतींनी स्पष्ट केले. कमांडर-इन-चीफ या नात्याने माझ्यासाठी आणि संपूर्ण केनिया संरक्षण दलांसाठी ही दु:खाची वेळ आहे. आजचा दिवस देशासाठी सर्वात दुर्दैवी आहे. आम्ही आमचे सर्वात धाडसी सेनापती गमावले, असेही राष्ट्रपती म्हणाले.

जनरल ओगोला 1984 मध्ये केनिया संरक्षण दलात सामील झाले होते. 1985 मध्ये केनिया हवाई दलात नियुक्त होण्यापूर्वी त्यांना द्वितीय लेफ्टनंट म्हणून बढती मिळाली. 61 वषीय ओगोला हे सेवेत असताना मृत्यू झालेले देशाचे पहिले लष्करप्रमुख ठरले. राष्ट्रपती विल्यम ऊटो यांनी 2023 मध्ये ओगोला यांना जनरल पदावर बढती दिली होती. त्यांची संरक्षण दलाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. याआधी ते संरक्षण दलाचे उपप्रमुखपद सांभाळत होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article