वैष्णोदेवीला जाणाऱ्या एक्स्प्रेसला अपघात
लुधियाना येथे कपलिंग तुटल्यामुळे रेल्वेचे दोन भागात विभाजन : 1,200 प्रवासी थोडक्यात बचावले
वृत्तसंस्था/ लुधियाना
वैष्णोदेवीला 1,200 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एक्स्प्रेस ट्रेनला लुधियाना रेल्वे स्टेशनवर अपघात झाला. स्लीपर कोचमधील शौचालय अचानक मोठ्या आवाजासह तुटल्यामुळे तो कोच शेजारच्या कोचपासून वेगळा झाला. स्फोटासारखा आवाज ऐकून प्रवासी घाबरले. ट्रेन थांबताच प्रवाशांनी रेल्वेतून बाहेर उड्या मारत बचावाचा प्रयत्न केला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. कपलिंग तुटल्याने स्लीपर कोचमधील शौचालयाचे नुकसान झाले. या अचानक घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण ट्रेनमध्ये घबराट पसरली होती.
नवी दिल्लीहून श्री माता वैष्णोदेवी कटरा येथे जाणारी विशेष ट्रेन (04081) शनिवारी सकाळी लुधियाना येथे पोहोचल्यानंतर हा अपघात झाला. रेल्वे लुधियानाहून पुढे निघण्याच्या तयारीत असतानाच दोन कोचेसला जोडणारे कपलिंग अचानक तुटले. कपलिंग तुटताच एक मोठा आवाज झाल्यामुळे प्रवासी भयभीत झाले. ट्रेनचे दोन तुकडे झाल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली आणि ते जीव वाचवण्यासाठी पळू लागले. स्फोटामुळे कपलिंग तुटल्याचा दावा प्रवाशांनी केल्यामुळे याप्रकरणी सखोल तपास केला जात आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपासणी केली. मात्र, याप्रकरणी तूर्तास भाष्य करण्यास नकार दर्शवला.
स्फोटामुळे घबराट
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, एक्स्प्रेस रेल्वे लुधियाना स्टेशनवरून निघाली असतानाच अचानक एक मोठा आवाज ऐकू आला. तो आवाज इतका जोरदार होता की प्रवाशांना काहीतरी अनुचित घडल्याची जाणीव झाली. कपलिंग तुटल्याच्या हादऱ्याने स्लीपर कोचमधील शौचालयाचे मोठे नुकसान झाले. या अचानक घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण ट्रेनमध्ये घबराट पसरली आणि प्रवासी घाबरून डब्यातून बाहेर पळू लागले.
वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल
अपघाताची माहिती मिळताच रेल्वे संरक्षण दल, जीआरपी आणि रेल्वे आयुक्तालय पोलिसांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. रेल्वेच्या तांत्रिक अधिकाऱ्यांचे एक पथकही