यल्लम्मा डोंगरावरून परतणाऱ्या चव्हाट गल्लीच्या भाविकांचा अपघात
06:36 AM Jan 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
टायर फुटून टाटा एस कलंडल्याने सात जण जखमी
Advertisement
प्रतिनिधी/ बेळगाव
सौंदत्ती यल्लम्मा देवीचे दर्शन घेऊन बेळगावला परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला शनिवारी रात्री हलगाजवळ अपघात झाला आहे. टायर फुटून टाटा एस कलंडल्याने सात जण जखमी झाले आहेत.
Advertisement
जखमी भाविक चव्हाट गल्ली येथील असल्याची माहिती मिळाली असून, त्यांना खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. देवीचे दर्शन आटोपून बेळगावला परतताना टायर फुटून वाहन कलंडले. या वाहनात एकूण 12 जण होते. यापैकी सात जण जखमी झाले असून, त्यांना खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती समजताच हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक एस. के. होळेण्णावर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काहीकाळ खोळंबली होती. एका बाजूची वाहतूक बंद करून पोलिसांनी जखमींना इस्पितळात हलविले.
Advertisement