महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

माशवी - गावव्हाळ येथे रिक्षा व आराम बसमध्ये अपघात

01:22 PM May 08, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

रिक्षेतील नऊ वर्षाच्या मुलाच्या पायाचे दोन तुकडे ; अपघातानंतर बसचालकाने बस सोडून केले पलायन

Advertisement

आचरा प्रतिनिधी

Advertisement

आचरा- देवगड रस्त्यावर माशवी गावव्हाळ येथील अवघड वळणावर खाजगी बसने दहिबावच्या दिशेने जाणाऱ्या रिक्षेला जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. ही धडक एवढी जोरात होती की, रिक्षेमध्ये उजव्या बाजूस बसलेल्या नऊ वर्षाच्या मुलाच्या उजव्या पायांचे दोन तुकडे झालेत. रिक्षातील मुलाचे आई वडीलही जखमी झालेत. अपघात झाल्यावर जखमींना आचरा रुग्णालयात हलवण्यात आले होते. अधिक उपचारासाठी ओरोस येथे हलविण्यात आले. अपघात झाल्याचे समजल्यानंतर देवगड पोलीस ठाण्याचे पोलीस विजय बिर्जे, सागर चौगले घटनास्थळी दाखल झाले होते. या अपघातात रिक्षामधील रुद्र लवू घाडी वय- (9,) लवू धोंडू घाडी( वय 45), रुचिता लवू घाडी (40) रा सर्व दहिबाव हे गंभीर जखमी झालेत. तर रिक्षा चालक रिक्षा वसंत गोविंद परब रा -पोईप यांना किरकोळ दुखापत झाली.

दहिबाव येथील लवू घाडी हे आपल्या कुटूंबासमवेत पत्नीच्या माहेरी मालडी येथे काही दिवसापूर्वी गेले होते. ते मालडी येथून बुधवारी सकाळी आचरा मार्गे देवगड- दहिबांव येथे पोईप येथील रिक्षाने मालडी येथून पत्नी रुचिता व मुलगा रुद्र यांच्या समवेत जात होते. सकाळी साडेनऊच्या सुमारास आचरा देवगड रस्त्यावर माशवी गावव्हाळ येथील अवघड वळणावर आले असता समोरून आचराच्या दिशेने येणाऱ्या आराम बसने(आराम बस नंबर MH04 GP. 1875) रिक्षेच्या (रिक्षा नंबर MHO7 F 2115) उजव्या बाजूला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की काही अंतर रिक्षा फरफटत जाऊन कलंडली. धडकेत उजव्या बाजूला बसलेला रुद्र घाडी याचा उजवा पाय रिक्षा आणि आरामबसचा भागात सापडल्याने पायाचे दोन तुकडे झालेत. तर रिक्षातील लवू घाडी व रुचिता यांनाही डोक्याला व कानाच्या मागे गंभीर दुखापती झाल्या. अपघाता नंतर आरामबस चालक बस तेथेच टाकून पसार झाला होता. रस्त्याने येणाऱ्या प्रवासी व स्थानिकांनी जखमींना उपचारासाठी आचरा आरोग्य केंद्रात हलवले होते. अपघात झाल्याचे समजल्यानंतर स्थानिक व दहिबाव येथील ग्रामस्थ जमा झाले होते. फरार झालेल्या चालकाला पकडून आणण्याची मागणी ग्रामस्थांनी देवगड पोलिसांकडे लावून धरली होती.

Advertisement
Tags :
# accident # tarun bharat news#
Next Article