मांद्रेत हृदयद्रावक अपघात नणंद, भावजय जागीच ठार
समोऊन येणाऱ्या ट्रकखाली चिरडल्याने दोघींचा मृत्यू
पेडणे, मोरजी (प्रतिनिधी)
राज्यातील मांद्रे व नानाडो या दोन ठिकाणी शनिवारी झालेल्या भीषण अपघातात चारजण ठार झाले. मांद्रे ग्रामपंचायतीजवळ शनिवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात आस्कावाडा मांद्रे येथील सानिका सुभाष खर्बे (19 वर्षे) व प्रियांका संदेश खर्बे (29 वर्षे) या नणंद - भावजय दोघीजणी जागीच ठार झाल्या, तर तिसरी युवती गंभीररित्या जखमी झाली.
सविस्तर माहितीनुसार, सानिका सुभाष खर्बे, प्रियांका संदेश खर्बे आणि सिद्धी शेटकर या तिघेजणी एकाच स्कूटरवऊन (जीए 11, सी 2029) मांद्रे मासळी मार्केटकडे मासे आणण्यासाठी जात होत्या. मासळी मार्केटच्या दोनशे मीटर अगोदर पिकअप रिक्षा मांद्रे भागातून हरमल बाजूला जात होती. तर त्याच्या विऊद्ध दिशेने ट्रक (केए 22 डी 4822) हा मांद्रेमार्गे आगरवाडा शिवोलीला जात होता. दुचाकीस्वारांनी पिकअप रिक्षेला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांची रिक्षाच्या मागच्या बाजूला धडक बसली व त्या दुचाकीसह रस्त्यावर कोसळल्या. त्याचवेळी समोऊन येणाऱ्या ट्रकच्याखाली सापडून सानिका सुभाष खर्बे आणि प्रियांका संदेश खर्बे या दोघीजणी जागीच ठार झाल्या. तर दुचाकी चालवणारी युवती सिद्धी शेटकर ही गंभीररित्या जखमी झाली. तिला बांबोळी येथे उपचारासाठी पाठवण्यात आले. अपघातानंतर लोक गोळा होऊ लागल्याने ट्रक चालकाने ट्रकसह पळ काढला मात्र जमावाने पाठलाग कऊन आगरवाडा येथे तो अडवला. या अपघातात एकाच घरातील दोघेजणी जागीच ठार झाल्यामुळे आस्कावाडा परिसरात शोककळा पसरली आहे.
माशांचा बेत आला जीवावर
सात दिवसांच्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर निदान आज तरी मासे खायला मिळतील या उद्देशाने प्रियांका संदेश खर्बे, सानिका सुभाष खर्बे आणि सिद्धी शेटकर मिळून तिघेजण दुचाकीने मासे आणण्यासाठी मासळी मार्केटकडे निघाल्या असता वाटेतच हा अपघात झाल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. सानिका ही आयटीआय करत होती तर गंभीर जखमी झालेली सिद्धी शेटकर ही उच्च माध्यमिक शिक्षण घेत होती. प्रियांका ही गृहिणी होती. त्यांना दोन मुले आहेत. सिद्धी ही प्रियांकाची सख्खी बहीण आहे.
पोलिसांनी पिकअप रिक्षा व ट्रक घेतले ताब्यात
अपघाताला कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालक आणि रिक्षा चालकाला मांद्रे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघात झाल्यानंतर मांद्रे पोलीस निरीक्षक शरीफ जॅकीस यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन अपघाताचा पंचनामा केला. पिकअप रिक्षाचालक आणि ट्रक चालक यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून अधिक तपास करण्याचे काम पोलीस निरीक्षक शरीफ करत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
मांद्रे पंचायत क्षेत्रातील अनेक रस्ते धोकादायक आणि ख•sमय बनत असल्यामुळे आतापर्यंत अनेक अपघात झालेले आहे.
हा अपघात प्रत्यक्ष कुणीच पाहिला नसल्याने अपघात नेमका कसा घडला हे समजू शकले नाही. त्यामुळे पोलीस वेगळ्या माध्यमातून चौकशी करत आहेत.
ट्रकचालक, टेम्पो-रिक्षाचालक यांना अटक
दरम्यान, अपघात प्रकरणी मांद्रे पोलिसांनी ट्रकचालक कन्नपा वंटामूर्ती ( बेळगांव ) आणि टेम्पो-रिक्षाचालक दयानंद बानकर ( हरमल) यांना मांद्रे पोलिसांनी अटक केली.