For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीला अपघात

05:11 PM Dec 24, 2023 IST | Kalyani Amanagi
कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीला अपघात
Advertisement

कोल्हापूर प्रतिनिधी

Advertisement

आरोग्यमंत्री तानाजी सावंत आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. दरम्यान कोल्हापुरात अंबाबाईचे दर्शन घेऊन जोतिबाच्या दर्शनाला जाताना त्याच्या गाडीचा अपघात झाला आहे. कोल्हापूर पन्हाळा मार्गावर रजपूतवाडी येथे दोन गाड्या एकमेकांना धडकून ही घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणतीच जीवित हानी झाली नसून आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे सुखरूप आहेत, तर त्यांचे स्वीय सहाय्यक रविराज जाधव किरकोळ जखमी झाले आहेत. मंत्र्यांच्या गाडीला त्यांच्या ताफ्यातीलच गाडीने धडकले आहे. या अपघातात गाड्यांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.