कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

निवळीत अपघातग्रस्त ट्रकला आग

03:38 PM May 10, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

रत्नागिरी :

Advertisement

मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी घाटात अपघातग्रस्त झाल्यानंतर ट्रकने पेट घेतल़ा ही आग एवढी भयानक होती की, ट्रक पूर्णपणे जळून खाक झाल़ा ही घटना गुऊवारी रात्री 9.15 वाजण्याच्या सुमारास घडल़ी या अपघातात ट्रक क्लिनर प्रकाश बुधिया चौहान (38) किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.

Advertisement

ट्रकचालक अकबर जाफर अली (28) हा ट्रक (एमपी 09 एचएच 2054) जयगडमधून मध्यप्रदेशच्या दिशेने घेवून जात होत़ा निवळी घाट येथे कोळसा वाहतूक करणाऱ्या या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने तो डोंगराच्या कठड्यावर जाऊन आदळल़ा यानंतर ट्रकने पेट घेण्यास सुरवात केल़ी या घटनेमुळे परिसरात मोठा गोंधळ उडाला. यावेळी स्थानिक रहिवाशांनी तातडीने या घटनेची खबर अग्निशमन दल व पोलीस प्रशासनाला दिल़ी ट्रकमध्ये असलेल्या कोळशामुळे ट्रकने भीषण पेट घेतल़ा दरम्यान घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणल़ी मात्र आगीमुळे ट्रक जळून खाक झाला होत़ा

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article