Satara News : पाटणमध्ये रस्त्याच्या कामामुळे अपघात, ट्रक पलटी
केरा पुलाजवळ आयशर ट्रक पलटी,
पाटण : येथील केरा पुलाजवळ आयशर ट्रक पलटी झाल्याने सुदैवाने यामध्ये कोणी जखमी झाले नाही. मात्र रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने खबरदारी घेतली नसल्याचे हा अपघात घडला असल्याची चर्चा वाहनधारक व नागरिकांमधून होत आहे. म्हावशी पेठ येथे पेट्रोल पंप ते केरा पूल या रस्त्यावर काँक्रीटकरणाचे काम चालू आहे. एका बाजूला हे काम झाले असल्याने याच ठिकाणावरून दोन्ही बाजूची वाहतूक सुरू आहे.
या ठिकाणी ठेकेदाराने भराव टाकला आहे मात्र तो भराव पूर्णपणे रोलरच्या साह्याने दाबला नसल्याने तो भुसभुशीत आहे. त्याच्याचबाजूला पूर्णपणे भराव न टाकल्याने या ठिकाणी अनेक गाडचा घसरत आहेत. गुरुवारी २९ रोजी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास कराडवरून चिपळूणच्या दिशेने रद्दी पेपर घेऊन ट्रक निघाला होता.
केरा पुलाजवळ आल्यावर साईडपट्टी भुसभुशीत असल्याने पलटी झाला. सुदैवाने चालकास काहीही झाले नाही. या रस्त्याचे काम करत असताना ठेकेदाराने कोणतीही खबरदारी घेतली नसल्याचे दिसून आले. अपघात टाळण्यासाठी ठेकेदाराने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. पोलीस निरीक्षक अविनाश कवठेकर, हवालदार संतोष कुचेकर तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.