Solapur : सोलापुरात रिक्षाच्या धडकेत महिला गंभीर जखमी
06:07 PM Dec 26, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement
सोलापूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा नोंद
Advertisement
सोलापूर : सिध्देश्वर साखर कारखान्याच्यापुलाजवळ भरधाव रिक्षाने दुचाकीला धडक दिल्याची घटना दि. २९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी सुमारे ९.२० वाजण्याच्या सुमारास घडली.
या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेच्या दोन्ही पायांना व कमरेला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याची नोंद २३ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता करण्यात आली.
Advertisement
फिर्यादी लक्ष्मण संभाजी अभंगराव (वय-५०, रा. मंजरेवाडी) हे त्यांची दुचाकीवरून पत्नीला कामावर सोडण्यासाठी जाताना सकाळी हा अपघाता झाला.
Advertisement