महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विशाखापट्टणम रेल्वेस्थानकावर दुर्घटना

06:37 AM Aug 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

चार डब्यांनी घेतला पेट

Advertisement

वृत्तसंस्था/ विशाखापट्टणम

Advertisement

आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम रेल्वेस्थानकावर मोठी दुर्घटना टळली आहे. तिरुमला एक्स्प्रेसच्या 4 डब्यांमध्ये आग लागल्याची घटना तेथे घडली. परंतु आगीच्या दुर्घटनेपूर्वी रेल्वेचे हे डबे रिकामी होते. रेल्वेच्या डब्यांना लागलेली आग त्वरित विझविण्यात आली. आगीची दुर्घटना रविवारी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास घडली असल्याची माहिती विशाखापट्टणम पोलीस आयुक्त शंका व्रत बागची यांनी दिली आहे. आग लागली तेव्हा सुदैवाने या डब्यांमध्ये कुठलाही प्रवासी नव्हता, यामुळे जीवितहानी टळली ओह.

स्थानिक अग्निशमन सेवा अधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई करत डब्यांना लागलेली आग विझविली. आम्ही याप्रकरणी एफआयआर नोंदवत आहोत. आग लागण्यामागील कारण जाणून घेण्यासाठी फॉरेन्सिक तज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. या दुर्घटनेमागे शॉर्ट सर्किट किंवा अन्य कारण असू शकते असे अधिकाऱ्याने सांगितले. रेल्वेचे हे डबे देखभालीसाठी कोचिंग डेपो येथे नेण्यात येणार होते.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article