For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजगाव तिरोडा तिठा येथे दोन गाड्यांमध्ये अपघात

12:21 PM May 08, 2025 IST | अनुजा कुडतरकर
आजगाव तिरोडा तिठा येथे दोन गाड्यांमध्ये अपघात
Advertisement

न्हावेली / वार्ताहर
कणकवली येथील ओटव गावचे रहिवासी प्रमोद प्रभूदेसाई हे आपल्या ताब्यातील मारुती अल्टो कार (एम एच ०७ ए जी ४९८५ ) घेऊन सावंतवाडी येथून तिरोडा तिठ्याच्या दिशेने जात असताना तिरोडा तिठा येथे समोरून येणारे मळेवाड येथील व्यवसायिक प्रकाश राऊत यांच्या रॅायल एनफिल्ड बुलेट (एम एच ०७ ई ६२७७) आणि अल्टो कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन अपघात झाला . या अपघातात प्रकाश राऊत व त्यांची पत्नी यांना जबर मार लागला असून त्यांना १०८ रुग्णवाहिकेने गोवा - बांबोळी येथे ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने हलविण्यात आले आहे. यावेळी आजगाव येथील पोलीस पाटील सौ.निकिता पोकरे हे घटनास्थळी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.