For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फुणगूसमधील वळणावर अपघात, ट्रक दरीत कोसळला

11:28 AM Aug 01, 2025 IST | Radhika Patil
फुणगूसमधील वळणावर अपघात  ट्रक दरीत कोसळला
Advertisement

संगमेश्वर :

Advertisement

तालुक्यातील फुणगुस येथील त्याच अवघड वळणावर पुन्हा गुरुवारी सकाळी १० वाजता दुसरा अपघात झाला आहे. गोव्याहून वसईकडे जाताना गुगल मॅप द्वारे फुणगुस मार्गे हा ट्रक चालला होता. फुणगुस येथील अवघड वळणार गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात झाला. सुदैवाने चालकाने गाडीतून उडी मारल्यामुळे जीवितहानी टळली. दोन दिवसापूर्वी याच ठिकाणी केमिकल टँकरचा अपघात झाला होता. १५ दिवसातील हा तिसरा अपघात आहे. वारंवार घडणाऱ्या या अपघाताने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

सविस्तर वृत्त असे, पार्लेजी पेपर रॅपिंग रोल घेऊन ट्रक घेऊन गोव्याहून वसईकडे चालला होता. यामध्ये सात टन माल होता. फुणगुस येथे आला अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटला आणि ट्रक थेट ३०-४० फूट खोल दरीत कोसळला. यावेळी चालकाने गाडीतून उडी मारल्याने बचावला.

Advertisement

अपघाताच्या मोठ्या आवाजाने ग्रामस्थानी धाव घेतली आणि मदत केली. चालकाला दरीतून वर आणत पाणी दिले. ग्रामस्थ किरण भोसले, साहीम खान, प्रशांत थुळ, सुभाष लांजेकर, जमीर नाईक व ग्रामस्थ यांनी मदत केली. बारा दिवसापूर्वी कार दरीत कोसळली होती. त्यानंतर दोन दिवसापूर्वी आयशर टेम्पो याच ठिकाणी कोसळला होता. त्यानंतर आज पुन्हा ट्रक दरीत कोसळून मोठे नुकसान झाले आहे.

या अपघाताची माहिती संगमेश्वर पोलिसांना मिळाल्यावर घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.

Advertisement
Tags :

.