For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

4 हजाराची लाच घेताना इचलकरंजीचा तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात

03:45 PM Feb 08, 2024 IST | Abhijeet Khandekar
4 हजाराची लाच घेताना इचलकरंजीचा तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात
Advertisement

इचलकरंजी / प्रतिनिधी

मिळकत रजिस्टर बक्षीसपत्राने मिळालेल्या मिळकतीचे सात बारा पत्रकी नांव नोंद करण्यासाठी तक्रारदाराकडून 5 हजार रुपयाच्या लाचेची मागणी करून, 4 हजार रुपयाची लाच घेत असता इचलकरंजीच्या तलाठ्याला रंगेहात पकडून अटक केली. अमोल आनंदा जाधव ( मुळ रा. कोरवी गल्ली, आगर रोड, शिरोळ, सध्या रा. यशवंत रेसिडेंसी, आरकेनगर, शहापूर, ता. हातकणंगले ) असे त्याचे नाव आहे. ही कारवाई बुधवारी सांयकाळी कोल्हापूर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने इचलकरंजीचे तलाठी कार्यालयात केली. याबाबत गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक सरदार नाळे यांनी दिली.

Advertisement

पोलीस उपाधीक्षक नाळे म्हणाले, तक्रारदार यांच्या नातेवाईकांना शहरातील रिसनं ४५२ क्षेत्र ०.०.९० आर इतकी मिळकत रजिस्टर बक्षीस पत्राने सन २०१९ मध्ये मिळाली आहे. या मिळकतीचे सात बारा पत्रकी नांव नोंद करण्यासाठी तक्रारदारांकडे इचलकरंजीचे तलाठी अमोल जाधव ( मुळ रा. कोरवी गल्ली, आगर रोड, शिरोळ, सध्या रा. यशवंत रेसिडेंसी, आरकेनगर, शहापूर, ता. हातकणंगले ) यांने 5 हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली. या मागणीचे तडजोडीअंती 4 हजार रुपयाची लाच घेत असता तलाठी अमोल जाधव याला बुधवारी सांयकाळी इचलकरंजीचे तलाठी कार्यालयात केली.

या कारवाईत कोल्हापूर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस उपाधीक्षक सरदार नाळे, पोलीस निरीक्षक आसमां मुल्ला, सहाय्यक फौजदार प्रकाश भंडारे, हावलदर अजय चव्हाण, सुधीर पाटील, पोलीस नाईक सचिन पाटील, कॉन्स्टेबल संदीप पवार, हावलदार विष्णु गुरव, सुरज अपराध आदीचा सहभाग होता.

Advertisement

Advertisement
Tags :

.