For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चॉकलेट स्वीकारले...नोकरी गमावली

07:00 AM Sep 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
चॉकलेट स्वीकारले   नोकरी गमावली
Advertisement

आपण जेव्हा कोणत्याही संस्थेत किंवा सरकारदरबारी नोकरी करत असतो, तेव्हा नोकरीचे नियम काय आहेत याची काटेकोर माहिती करुन घेणे अत्यावश्यक आहे. तसे न केल्यास मोठीच अडचण समोर उभी राहू शकते. चीनमधील वॉन्गक्विंग येथील या घटनेतून हा बोध घेता येतो. येथील एका माँटेसरीचे प्रिन्सिपॉल वांग यांना आलेला अनुभव सर्वांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. यंदाच्या शिक्षकदिनी या माँटेसरीतील एका विद्यार्थ्याने वांग यांना आपुलकीने भेट म्हणून 60 रुपयांचे एक चॉकलेट दिले. विद्यार्थ्याने एवढ्या प्रेमाने दिलेले हे चॉकलेट त्यांनी खाल्ले. मात्र, ही कृती करुन आपण सरकारच्या नियमाचा भंग केला आहे याची जाणीव त्यांना त्यावेळी झाली नाही. हे चॉकलेट त्यांनी एकट्यानेच खाल्ले असेही नाही. त्यांनी ते माँटेसरीतील इतर मुलांनाही वाटले होते.

Advertisement

या प्रसंगानंतर काही दिवसांनी त्यांना सरकारची नोटीस आली. त्यांना नोकरीवरुन काढून टाकण्यात येत आहे, असा मजकूर त्या नोटीसीत पाहून त्यांच्या डोळ्यासमोर अंधेरी आली. आपण विद्यार्थ्याकडून भेटवस्तू स्वीकारली आहे. हे आपल्या सेवेच्या नियमांच्या विरुद्ध आहे. या कारणास्तव आपल्याला नोकरीवरुन कमी करण्यात येत आहे, असा मजकूर त्या नोटीसीत होता. तथापि, वांग यांनी या नोटीसीला न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने नोटीस रद्द करण्याचा आदेश दिला आहे. कारण न्यायालयाच्या निर्णयानुसार एक चॉकलेटची भेटी हा लाच देण्याचा प्रकार असू शकत नाही. मात्र अद्याप सरकारने न्यायालयाचा आदेश मानलेला नाही. कदाचित सरकारकडून या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते. त्यामुळे वांग यांच्यावरील टांगती तलवार अद्याप कायम आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.