Kolhapur : इचलकरंजी महापालिका निवडणुकांना गती; सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
इचलकरंजीत पहिल्या महापालिका निवडणुकीची धामधूम वाढली
इचलकरंजी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आरक्षण मयदिसंदर्भात झालेल्या सुनावणीनंतर नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका सुरळीत पार पडणार आहेत. त्यामुळे आगामी काळात इचलकरंजी महापालिका निवडणुकाही वेळेत पार पडण्याचे संकेत दिसत असल्याने इच्छुकांना दिलासा मिळाला असून आता निवडणुकांचे रण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षण मयदिबाबत शुक्रबार २८ रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यामध्ये सध्या प्रक्रीया सुरु असलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांना स्थगिती न देता न्यायालयाच्या अंतिम निर्णयाला बांधिल राहून निवडणुका कार्यक्रम घेण्याचे सुचित केले आहे. यामुळे सध्या सुरु असलेल्या नगरपालिका व नगरपंचायती निवडणुकीचा धुरळा सुरु राहणार आहे. यामुळे आतापर्यंत इचलकरंजी महापालिकेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची मरगळही झटकली गेली आहे.
वास्तविक पाहता इचलकरंजी महापालिकेची ही पहिली निवडणूक होत आहे. यामध्ये एकूण ६५ नगरसेवकांसाठी १६ प्रभागाची रचना करण्यात आली आहे. यापैकी १५ प्रभाग हे चार सदस्यीय तर शेवटचा प्रभाग क्रमांक १६ हा पाच सदस्यीय करण्यात आला आहे. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभागरचना झाल्यानंतर आरक्षण आणि त्यानंतर फेरआरक्षण प्रक्रियाही पार पडल्याने प्रत्येक प्रभागतील इच्छुकांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत आरक्षण मयदिबाबत पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी असल्याने सर्वामध्ये पुन्हा एकदा धाकधूक निर्माण झाली होती.
अखेर शुक्रवारी न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर मात्र येथील इच्छुकांना दिलासा मिळाला आहे. सध्या महापालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीवर हरकती मागवण्याचे काम महापालिकेच्या निवडणूक विभागामार्फत सुरू आहे. यावेळी अनेक इच्छुकांसह मतदारांनीही हरकती नोंदवल्या आहेत. अंतिम मतदार यादी ही २२ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल असे मत काही राजकीय जाणकारांकडून व्यक्त होत आहे. पण लवकरच निवडणुकीचा धुरळा उडणार असल्याने इच्छुकांचा उत्साह मात्र वाढलेला दिसून येत आहे.