For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

हिवाळी अधिवेशनाची तयारी गतिमान करा

06:43 AM Nov 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
हिवाळी अधिवेशनाची तयारी गतिमान करा
Advertisement

प्रभारी जिल्हाधिकारी राहुल शिंदे यांची सूचना : जि. पं. सभागृहात बैठक

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

आगामी हिवाळी अधिवेशन यशस्वी व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच तयारीला गती द्यावी. अधिवेशनासाठी स्थापन करण्यात आलेल्या विविध समित्या व उपसमित्यांनी परस्पर समन्वय राखून जबाबदारीने काम करावे. कोणत्याही व्यवस्थेत त्रुटी राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी तथा जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांनी दिले.

Advertisement

बुधवारी जिल्हा पंचायत सभागृहात हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी आयोजित विविध समित्यांच्या प्राथमिक बैठकीत ते बोलत होते. शिंदे म्हणाले, अधिवेशनासाठी बेळगावात येणारे मंत्री, लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवास आणि भोजन व्यवस्थेचे योग्य नियोजन करण्यात यावे. यासाठी शहरातील हॉटेल्समधील खोल्या आगाऊ आरक्षित करून आवश्यक व्यवस्था वेळेत पूर्ण करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

सुवर्णविधानसौधमधील मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कक्षांमध्ये संगणक यंत्रणा आधीच बसवून ती व्यवस्थित कार्यरत असल्याची खात्री करावी. तसेच अधिवेशनाच्या संपूर्ण कालावधीत इंटरनेट सेवा अखंडित सुरू राहण्यासाठी संबंधित संस्थांशी तातडीने समन्वय साधावा. अधिवेशनासाठी येणारे मंत्री, मान्यवर, अधिकारी व माध्यम प्रतिनिधींच्या निवासस्थानी आपत्कालीन वैद्यकीय पथके तैनात ठेवावीत. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध होईल, अशापद्धतीने आरोग्य यंत्रणेने सज्ज राहावे, असेही त्यांनी सांगितले.

अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनाची जबाबदारी सर्व विभागांवर असून प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने आपापली जबाबदारी ओळखून काम करणे आवश्यक आहे. समित्यांमध्ये समन्वयाचा अभाव राहू नये तसेच ऐनवेळी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी सर्व तयारी वेळेत पूर्ण करावी, अशी सूचनाही शिंदे यांनी दिली.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी रोहित सिंग, काडा प्रशासक एस. एस. बिरादार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.