पत्रादेवी चेकनाक्यावरील अबकारी कार्यालयावर एसीबीचा छापा; १३ हजारांची रोकड जप्त
10:43 AM Oct 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
पत्रादेवी: गोवा-महाराष्ट्र सीमेवरील पत्रादेवी चेकनाक्यावरील अबकारी कार्यालयावर भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने छापा टाकून कारवाई केली. या कारवाईदरम्यान १३ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. रात्री उशिरापर्यंत या कार्यालयातील कारवाई सुरू होती.
पत्रादेवी चेकनाक्यावर असलेल्या अबकारी कार्यालयात एसीबीच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत नेमकी कोणती अनियमितता आढळली, तसेच जप्त करण्यात आलेली रोकड कोणत्या कारणासाठी ठेवण्यात आली होती, याबाबत अधिकृत तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही.
Advertisement
सीमावर्ती तपासणी नाक्यावरील अबकारी कार्यालयावर झालेल्या या कारवाईमुळे परिसरात चर्चा सुरू झाली आहे. एसीबीच्या पथकाकडून रात्री उशिरापर्यंत तपासणी आणि आवश्यक कार्यवाही सुरू होती.
दरम्यान, या प्रकरणात कोणावर कारवाई करण्यात आली आहे आणि पुढील तपासात काय निष्पन्न होते, याबाबत अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.
Advertisement
Advertisement