For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एसीच्या किंमती 15 टक्क्यांपर्यंत वाढणार

06:16 AM Feb 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
एसीच्या किंमती 15 टक्क्यांपर्यंत वाढणार
Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

लवकरच उन्हाळा सुरु होणार असून एअरकंडिशनरच्या किंमती 5 ते 15 टक्के इतक्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. देशातील सर्वात मोठी एसी निर्माता कंपनी वोल्टास यांनी यासंदर्भातले संकेत नुकतेच वर्तविले आहेत.

काय म्हणाले एमडी

Advertisement

कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मुकुंदन मेनन यांच्या माहितीनुसार तांब्याच्या किंमतीमध्ये वाढ होत असून डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया कमकुवत होत असल्या कारणाने एसीच्या किंमती येत्या काळामध्ये वाढणार आहेत. देशांतर्गत बाजारामध्ये कंपनीची हिस्सेदारी 18 टक्क्यांपर्यंत राहणार असून 2026 मध्ये एसींची विक्री 15 ते 20 टक्के इतकी वाढणार असल्याचेही त्यांनी अनुमान नोंदविले.

का वाढणार किमती

मागचे वर्ष हे एसीच्या विक्रीकरीता सर्वात खराब राहिले होते. याचदरम्यान अलीकडच्या काळात तांबे, अॅल्युमिनिअम आणि पोलाद या कच्च्या मालांच्या किंमतीत वाढ झाली आहे. या किंमती वाढीचा परिणाम एसी उत्पादन खर्चावरही पडतो आहे. मागच्या वर्षी तांब्याची किंमत 8,500 डॉलर्स प्रतिटन इतकी होती. जी आता सध्याला 12000 ते 13000 डॉलर प्रतिटन इतकी झाली आहे. एसीला लागणारे बरेचशे सुट्टे भाग विदेशातून मागविले जातात. डॉलरच्या नुलनेत रुपया कमकुवत झाल्याने सदरच्या घटकांची किंमत वाढते आहे. याही खर्चाचा भार अप्रत्यक्षपणे एसी उत्पादन खर्चावर पडतो आहे.

Advertisement
Tags :

.