एसी मिलान अंतिम फेरीत
06:16 AM Jan 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था / रियाद
Advertisement
सौदी अरेबियामध्ये सुरू असलेल्या इटालियन सुपर चषक फुटबॉल स्पर्धेत एसी मिलान संघाने ज्युवेंटसचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. आता एसी मिलान आणि इंटर मिलान यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल.
उपांत्य फेरीच्या सामन्यात एसी मिलानने ज्युवेंटसचा 2-1 अशा गोल फरकाने पराभव केला. अशा सामन्यात एसी मिलान संघातील तुर्कीचा फुटबॉलपटू किनेनने पूर्वाधार्थ गोल केला. 71 व्या मिनिटाला ख्रिस्टेन पुलीसिकने ज्युवेंटर्सला बरोबरी साधून दिली. 76 व्या मिनिटाला ज्युवेंटसच्या गॅटीने नजर चुकीने आपल्याच संघाच्या गोलपोस्टमध्ये चेंडू लाथाडून एसी मिलानला निर्णायक आणि बोनस गोल बहाल केला. इंटर मिलानने दुसऱ्या उपांत्य सामन्यात अॅटलांटचा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. आतापर्यंत इंटर मिलान संघाने तीनवेळा ही स्पर्धा जिंकली आहे.
Advertisement
Advertisement