महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आरसीयुने वाढीव प्रवेश शुल्क मागे घ्यावे अभाविपतर्फे कुलगुरुंना निवेदन

10:25 AM Jun 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : राणी चन्नम्मा विद्यापीठाने प्रवेश शुल्कात मोठी वाढ केली आहे. सर्वसामान्य विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे. त्यामुळे चन्नम्मा विद्यापीठाने शुल्कवाढ मागे घ्यावी, अशी मागणी अभाविपने कुलगुरू सी. एम. त्यागराजन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. आधीच महागाईमध्ये होरपळणाऱ्या पालकांना आता फी वाढीचा फटका बसत आहे. बीबीए-बीसीएच्या विद्यार्थ्यांवर फी वाढीचा अतिरिक्त बोजा लादण्यात आला आहे. मागील वर्षी 3,050 रुपये असणारी फी यावर्षी 4,400 रुपयांपयर्तिं वाढविण्यात आली आहे. विद्यापीठात शिकणारी अधिकाधिक मुले ही कष्टकरी व शेतकऱ्यांची आहेत. त्यामुळे ही फी वाढ विद्यार्थ्यांना परवडणारी नाही. त्यामुळे विद्यापीठाने ही शुल्कवाढ मागे घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा अभाविपने दिला आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article