For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हुबळीतील विद्यार्थिनीच्या खुनाचा अभाविपतर्फे निषेध

10:34 AM Apr 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
हुबळीतील विद्यार्थिनीच्या खुनाचा अभाविपतर्फे निषेध
Advertisement

चन्नम्मा चौकात विद्यार्थ्यांनी छेडले आंदोलन

Advertisement

बेळगाव : हुबळी येथील बीव्हीबी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा निर्घृण खून कॉलेज कॅम्पसमध्ये करण्यात आला. ही एक धक्कादायक बाब असून राज्यात कॉलेजचे कॅम्पसही सुरक्षित राहिलेले नाहीत. राज्याला काळिमा फासणारी ही घटना असून असे प्रकार यापुढे होऊ नयेत, यासाठी दोषीवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे चन्नम्मा चौक येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. एमसीए शिकणारी विद्यार्थिनी नेहा हिरेमठ हिच्यावर हल्लेखोराने चाकूने नऊ वार करून खून केला. संशयित फय्याज हा बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील असून त्याच्यावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. अशा प्रकारांमुळे विद्यार्थिनी महाविद्यालयांमध्ये जाण्यासही धजावत आहेत. महाविद्यालयांमध्ये घुसून खून करण्यापर्यंत हल्लेखोरांची ताकद वाढली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची राज्यात भीती उरली नसल्याने असे प्रकार होत असून पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे, असे अभाविपने म्हटले आहे. शुक्रवारी दुपारी राणी चन्नम्मा चौकात बेळगाव परिसरातील महाविद्यालयीन विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. ठिय्या आंदोलन करत नेहा हिरेमठ हिला न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली. कायद्याचा धाक राहिला नसल्याने असे प्रकार वरचेवर घडत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी अभाविपचे रोहित हुमणाबादीमठ यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

दोषीवर कठोर कारवाई करावी

राज्यातील एका महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये एकतर्फी प्रेमातून हत्येची घटना घडणे ही राज्यासाठी काळिमा फासणारी बाब आहे. महाविद्यालयांमध्ये जर असे प्रकार सुरू झाल्यास उद्या विद्यार्थिनी महाविद्यालयांपर्यंत येणेही कठीण होईल. त्यामुळे दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही अभाविपने पोलिसांकडे केली आहे.

- रोहित हुमणाबादीमठ

Advertisement
Advertisement
Tags :

.