For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार! महिलेसह एकावर गुन्हा जबरदस्तीने गाडीतून नेवून केला अत्याचार

03:34 PM Sep 10, 2024 IST | Abhijeet Khandekar
अल्पवयीन मुलीवर अत्याचार  महिलेसह एकावर गुन्हा जबरदस्तीने गाडीतून नेवून केला अत्याचार
Sangli Crime
Advertisement

व्हिडीओ बनवून चाकूच्या धाकाने दिली घरच्यांना मारण्याची धमकी

आटपाडी प्रतिनिधी

शाळेतून घरी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने गाडीतून नेवून तिच्या अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उजेडात आला आहे. अत्याचाराचे व्हिडीओ बनवून पुन्हा चाकूचा धाक दाखवून अत्याचार करणाऱ्या संग्राम देशमुख आणि तिची साथीदार सुमित्रा लेंगरे यांच्याविरोधात आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, यातील आरोपीने लैंगिक अत्याचाराचे अनेक कांड आणि अनेक अश्लिल व्हिडीओ बनविल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

Advertisement

पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी आटपाडी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संग्राम देशमुख (आटपाडी) व सुमित्रा लेंगरे (लेंगरेवाडी) यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित शाळकरी मुलगी शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना संग्राम आणि सोबतची महिला सुमित्रा हिने जबरदस्तीने लाल रंगाच्या चारचाकी गाडीत बसविले. ही गाडी गावाबाहेर नेवून गाडीतच अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला.

त्या अत्याचाराचे फोटो आणि व्हिडीओ करून चाकूचा धाक दाखविला. तुझ्या घरच्यांना मारून टाकेन, अशी धमकीही संग्रामने दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर भीती दाखवून पुन्हा गाडीतून नेवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबियांनी पीडित मुलीकडे चौकशी केली असता संपूर्ण घटनाक्रमाचा उलगडा झाला. त्यानंतर आटपाडी पोलिसात संग्राम देशमुख आणि सुमित्रा लेंगरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरूणाची आटपाडीत जीम आहे. त्याच्या मोबाईलमध्ये अनेक आक्षेपार्ह अश्लिल फोटो आणि व्हिडीओ असल्याची चर्चा एक महिन्यापासून सुरू आहे. शिवाय त्याचे एक प्रकरण यापूर्वी मिटवण्यात आले आहे. अल्पवयीन शाळकरी मुलींना फूस लावून, भीती दाखवून, व्हिडीओ-फोटोव्दारे ब्लॅकमेलिंग करून पूर्ण काचा गडद काळ्या केलेल्या लाल रंगाच्या चारचाकी गाडीतून नेवून असे लैंगिक कांड केल्याची चर्चा सोमवारी आटपाडी पोलीस ठाण्यात सुरू होती. दरम्यान, पोलिसांनी या लैंगिक कांडाचा पर्दाफाश करून दोषींना जेरबंद करावे, अशी मागणी आटपाडीकरांतून होत आहे.

Advertisement
Tags :

.