महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारत दौऱ्यावर येणार अबुधाबीचे युवराज

07:00 AM Aug 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पंतप्रधान मोदींशी करणार द्विपक्षीय चर्चा

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

अबुधाबीचे युवराज खालिद बिन मोहम्मद बिन जायद अल नाहयान हे पुढील महिन्यात भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. नाहयान हे संयुक्त अरब अमिरातच्या पुढील नेतृत्वाचे दावेदार आहेत. भारत आणि युएईदरम्यान व्यापार आणि रणनीतिक संबंध मजबूत करण्याच्या दिशेने चर्चा करण्यासाठी ते दौऱ्यावर येत आहेत. शेख खालिद हे 8 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत दाखल होतील. या दौऱ्यादरम्यान ते पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. त्यांचा हा दौरा आगामी दशकांमध्ये भविष्यातील संबंध अधिक दृढ करण्यावर केंद्रीत असणार आहे.

भारत आणि युएईचे संबंध सध्या अत्यंत दृढ असून त्यांचा हा दौरा द्विपक्षीय संबंध वृद्धींगत करण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे एका अधिकाऱ्याने म्हटले आहे. या दौऱ्यादरम्यान कुठल्याही प्रकारचा करार होण्याची शक्यता नाही. परंतु दोन्ही देशांदरम्यान व्यापारापासून सुरक्षेपर्यंतच्या क्षेत्रांमधील संबंध मजबूत करण्याच्या प्रतिबद्धतेची पुष्टी होण्याची अपेक्षा आहे. नाहयान यांचा हा दौरा अलिकडच्या वर्षांमध्ये दोन्ही देशांकडून करण्यात आलेल्या अत्यंत हाय-प्रोफाइल दौऱ्यांच्या पार्श्वभूमीवर होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2015 पासून युएईचा सातवेळा दौरा केला आहे. तर युएईचे अध्यक्ष मोहम्मद बिन जायद अल नाहयान हे सप्टेंबर 2023 मध्ये भारत दौऱ्यावर आले होते. नाहयान याहंनी शेख खालिद यांना मार्च 2023 मध्ये अबुधाबीचा युवराज घोषित केले होते.

बळकट व्यापारी संबंध

2022 पासून भारत-युएई व्यापक आर्थिक भागीदारी करार लागू झाल्यापासून द्विपक्षीय व्यापार वाढून जवळपास 85 अब्ज डॉलर्सचा झाला आहे. युएई हा अमेरिका आणि चीननंतरचा भारताचा तिसऱ्या क्रमांकाचा व्यापारी भागीदार आहे. तर भारतासाठी दुसऱ्या क्रमांकाची निर्यात बाजारपेठ ठरला आहे. भारत आणि युएई यांच्यातील बिगर-कच्चे तेल व्यापाराचे मूल्य पुढील 5 वर्षांमध्ये 100 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक होण्याची अपेक्षा आहे. युएई हा भारताचा सातव्या क्रमांकाचा गुंतवणुकदार देखील आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article