महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अबु बकर अल-बगदादीच्या पत्नीला मृत्युदंड

07:00 AM Jul 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

महिलांच्या अपहरणात सामील : इराकच्या न्यायालयाने ठोठावली शिक्षा

Advertisement

वृत्तसंस्था /बगदाद

Advertisement

इराकच्या एका न्यायालयाने इस्लामिक स्टेटचा माजी प्रमुख अबु बकर अल-बगदादीची पत्नी अस्मा मोहम्मदला मृत्युदंड ठोठावला आहे. अस्मा मोहम्मदला यझिदी महिलांच्या अपहरणात बगदादीला साथ दिल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. अबु बकर अल-बगदादी हा 2014 पासून इस्लामिक स्टेटचा म्होरक्या होता, अमेरिकेने 27 ऑक्टोबर 2019 रोजी विशेष मोहिमेद्वारे सीरियात घुसून बगदादीचा खात्मा केला होता. त्याची पत्नी अस्माला दहशतवादविरोधी कायद्याच्या अंतर्गत ताब्यात घेण्यात आल्याचे इराकच्या सुप्रीम ज्युडिशियल कौन्सिलने सांगितले आहे. अस्माने यझिदी महिलांना स्वत:च्या घरात लपविले आणि मग त्यांना इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांच्या स्वाधीन केले होते. इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी यझिदी महिलांवर प्रचंड अत्याचार केले होते. अल बगदादीने 2014 मध्ये इस्लामिक स्टेट ही दहशतवादी संघटना निर्माण केली होती, त्यानंतर त्याने सीरिया आणि इराकच्या एका मोठ्या भूभागावर कब्जा केला होता.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article