For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फरार सागर कारिवडेकर सावंतवाडी पोलिसांच्या ताब्यात

09:55 PM Apr 26, 2026 IST | अनुजा कुडतरकर
फरार सागर कारिवडेकर सावंतवाडी पोलिसांच्या ताब्यात
Oplus_16908288
Advertisement

सावंतवाडी 

Advertisement

सावंतवाडी शहरातील सर्वोदय नगर येथे ऑक्टोबर महिन्यात पुणे येथील आलेल्या तरुणाला मारहाण आणि गाडी अंगावर घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व गेले काही महिने फरार असलेल्या मुख्य सूत्रधार सागर कारिवडेकर याला रविवारी रात्री सावंतवाडी पोलिसांनी सापळा रचून सावंतवाडी लगतच्या गावात अटक केली. ६ ऑक्टोबर २०२५ रोजी मध्यरात्री सर्वोदयनगर येथील   सागर कारिवडेकर याच्या घराच्या परिसरात पुणे येथून आलेल्या व स्थानिक तरुणांमध्ये मारामारी झाली होती. याप्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या होत्या. पुणे येथील शौनक सपकाळ यांनी पोलीस ठाण्यात दिलेला तक्रारीवरून सागर कारिवडेकर तसेच ५ जणांविरुद्ध गाडी अंगावर घालून खुनाचा प्रयत्न व मारहाण या कलमाअन्वये गुन्हा दाखल झालेला होता. त्यामध्ये तहा राजगुरू, तला राजगुरू रा. बांदा तसेच नितीन मेस्त्री रा. कोलगाव इतर सर्व आरोपी अटक झालेले होते मात्र सागर कारिवडेकर हा फरार होता.रविवारी गुन्ह्यात फरार असलेला सागर कारिवडेकर हा आपल्या सासरवाडीला कारिवडे येथे येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी पथक तयार केले. चव्हाण यांच्या सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, हवालदार महेश जाधव, महेश निरवडेकर यांच्या पथकाने सापळा रचून त्याला रात्री ८ वा.च्या सुमारास ताब्यात घेतले आहे.
सागर सुबोध कारिवडेकर याच्यावर ठाणे व मुंबई येथे देखील आर्थिक व्यवहारासंबंधात गुन्हे दाखल आहेत. सकपाळ, देवकाते वगैरे गुंतवणूकदार यांच्यावर सागर कारिवडेकर यांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने हल्ला व मारामारी केल्याच्या गुन्ह्यात रविवारी रात्री अटक करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली.गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे व जयेश खंदरकर  करीत आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.