अल्पवयीन बलात्कार पीडितेला गर्भपाताची अनुमती
केरळ उच्च न्यायालयाची सशर्त मंजुरी
कोची : केरळ उच्च न्यायालयाने एका अल्पवयीन बलात्कार पीडितेला गर्भपात करविण्याची अनुमती दिली आहे. ही पीडिता 28 महिन्यांची गरोदर आहे. उच्च न्यायालयाने वैद्यकीय समितीच्या एका अहवालाच्या आधारावर ही अनुमती दिली आहे. गर्भपात न करविल्यास 14 वर्षीय पीडितेला मानसिक आघात बसू शकतो असे वैद्यकीय समितीने म्हटले होते. न्यायालयाने गर्भपाताला मंजुरी देत याचिकाकर्त्याला (पीडितेची आई) एक प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा निर्देश दिला आहे. या प्रतिज्ञापत्रात वैद्यकीय पथकाला पीडितेच्या आईच्या जबाबदारीवर शस्त्रक्रिया करण्याचा अधिकार देण्यात येत असल्याचे नमूद असणार आहे. न्यायालयाने 12 ऑगस्ट रोजी या वैद्यकीय समितीची स्थापना केली होती. शस्त्रक्रियेनंतरही भ्रूण जिवंत असल्यास रुग्णालयाने त्याला वैद्यकीय उपचाराद्वारे वाचविण्याचा प्रयत्न करावा असे न्यायालयाने म्हटले आहे.