१८ डिसेंबरला झळकणार ‘अबीर’
सौंदर्याच्या पलिकडील स्त्राrमनाचा वेध घेणार
सौंदर्याच्या पारंपरिक व्याख्यांना छेद देत स्त्राrच्या आत्मसन्मानाचा, मनोधैर्याचा आणि अस्तित्वाच्या संघर्षाचा वेध घेणारा ‘अबीर’ हा मराठी चित्रपट रसिकांच्या मनात कुतूहल निर्माण करत आहे. या चित्रपटाच्या नव्या पोस्टरने उत्सुकतेत आणखी भर घातली आहे. स्त्राrच्या व्यक्तिमत्त्वाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन, सौंदर्याच्या कल्पनांमागील पूर्वग्रह आणि तिच्या अंतर्मनातील भावविश्व यांची झलक देणारे हे पोस्टर चित्रपटाच्या आशयाविषयी अनेक प्रश्न उपस्थित करते.
सुदेश वसंतराव झावरे पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आशा विष्णू शिंदे यांनी या चित्रपटाची पटकथा अन् संवाद लिहित दिग्दर्शनही केले आहे. सौंदर्यामुळे स्त्राrच्या कलागुणांपेक्षा तिच्यातील उणिवांनाच अधिक महत्त्व देणाऱ्या सामाजिक मानसिकतेवर चित्रपट भाष्य करतो.
प्रकाश-सावल्यांचा खेळ
स्त्राrने आत्मविश्वासाने उभे रहावे, तिच्यावरील भेदभाव आणि अत्याचार थांबावेत, हा या निर्मितीमागील महत्त्वाचा हेतू आहे. पोस्टरमध्ये गडद केशरी-तपकिरी रंगछटांच्या पार्श्वभूमीवर उमटलेली स्त्राrची छायाकृती, प्रकाश-सावल्यांचा खेळ आणि मध्यभागी झळकणारे ‘सौंदर्य चेहऱ्यात शोधायचं की संस्कारात?’ हे प्रश्नार्थक वाक्य लक्ष वेधून घेते.
पायल जाधव, निखिल चव्हाण, देविका दफ्तरदार, अविनाश नारकर, गणेश देशमुख, प्राजक्ता हनमघर, गार्गी फुले, यश डिंबळे, रोशन सुनील राऊत, प्रशांत नेटके, गायत्री सुदेश झावरे, रेखा दहातोंडे, राजवर्धन झावरे, साईराज केंद्रे यांच्या या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
