For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘किंग’साठी अभिषेकचा नवा लुक

06:34 AM Apr 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘किंग’साठी अभिषेकचा नवा लुक
Advertisement

खलनायकाच्या भूमिकेत दिसणार

Advertisement

शाहरुख खान स्वत:चा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘किंग’सोबत पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट असून यात अनेक मोठे कलाकार एकत्र दिसून येतील. तर अभिषेक बच्चनचा यात नवा लुक प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

अभिषेक किंग या चित्रपटाचा हिस्सा असून त्याने याकरता नवी केशरचना आणि लुक धारण केला आहे. चित्रपटात त्याची भूमिका अत्यंत खास असणार आहे. या चित्रपटात अभिषेक हा खलनायकाच्या भूमिकेत दिसून येऊ शकतो. अभिषेकचे चाहते त्याच्या या चित्रपटावरुन अत्यंत उत्साहित आहेत.

Advertisement

किंग या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहे. या चित्रपटात शाहरुख खान, सुहाना खान आणि अभिषेक बच्चनसोबत दीपिका पदूकोन, अरशद वारसी, जयदीप अहलावत, राघव जुयाल, सौरभ शुक्ला, अनिल कपूर, राणी मुखर्जी, जॅकी श्रॉफ यासारखे कलाकार दिसून येणार आहेत. हा चित्रपट 24 डिसेंबरला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

Advertisement
Tags :

.