टी-20 क्रमवारीत अभिषेक शर्मा अग्रस्थान कायम
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा 917 रेटिंग गुणांसह नवीनतम आयसीसी पुरूष टी-20 आंतरराष्ट्रीय फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम आहे. या 25 वर्षीय खेळाडूने 38 सामन्यांमध्ये दोन शतके आणि 8 अर्धशतकांसह 1297 धावा केल्या आहेत. नुकत्याच मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पाच्ज सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत, अभिषेक दोन अर्धशतकांच्या जोरावर 182 धावांसह तिसरा सर्वाध्घ्कि धावा करणारा खेळाडू होता. त्याचा करिअरमधील स्ट्राईक रेट 194 आहे आणि त्यान पॉवरप्लेमधील भारतीय फलंदाजीला एका वेगळ्याच पातळीवर नेले आहे. 2024 च्या विश्वचषकानंतर त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार मारले आहेत. फिल सॉल्ट 83 रेटिंग गुणांच्या फरकाने दुसऱ्या स्थानावर असून तो त्याचा सर्वात जवळचा प्रतिस्पर्धी आहे.
भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव ज्याने आपल्या तंत्रात थोडा बदल करुन फॉर्ममध्ये पुनरागमन केले आहे. त्याने फलंदाजी क्रमवारीत एक स्थानाची प्रगती करत सहावे स्थान पटकाहले आहे. त्याने 196.75 च्या शानदार स्ट्राईक रेटने आणि 80.67 च्या जबरदस्त सरासरीने 242 धावा केल्या होत्या आणि न्यूझीलंड टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत तो सर्वाधिक धा करणारा फलंदाज होता. दुखापतीमुण्s तिलक वर्मा तिसऱ्या स्थानावरुन चौथ्या स्थानावर घसरला. पोटाच्या शस्त्रक्रियेमुळे तो मायदेशात न्यूझीलंडविरुद्धची पाच सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकाही खेळू शकला नाही. अलिकडेच वर्माने अमेरिकेविरुद्ध टी-20 विश्वचषकाचा सराव सामना खेळला.
भारतीय मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीचे स्थान त्याच्या अलिकडच्या काळातील उत्कृष्ट, सातत्यपूर्ण कामगिरीमुळे अबाधित राहिले आहे. तो 776 रेटिंग गुणांसह आयसीसी पुरूषांच्या गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम आहे. चक्रवर्तीच्या मागे पाकिस्तानचा अबरार अहमद आहे. जो दोन स्थानांनी वर चढून दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. या पाकिस्तानी फिरकीपटूचे रेटिंग गुण 748 आहेत.
न्यूझीलंड टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत सर्वाधिक बळी घेणारा भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग 14 व्या स्थानावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियन अष्टपैलु कॅमेरॉन ग्रीन आणि द. आफ्रिकेचा सलामवीर क्विंटन डी कॉक यांनी काही प्रगती करत फलंदाजी क्रमवारीत अनुक्रमे 14 वे आणि 22 वे स्थान मिळवले आहे. इशान किशन आणि प्रोटियाजचा डावखुरा फलंदाज रायन रिकेल्टन यांनी लक्षणीय प्रगती केलीआहे. किशन 32 व्या स्थानावर पोहोचला तर रिक्लेटनने 42 स्थानांची झेप घेत नवीनतम फलंदाजी क्रमवारीत 40 वे स्थान पटकावले आहे.
इतर खेळाडूंमध्ये, इंग्लंडचा फिरकीपटू आदिल रशीद दोन स्थानांनी वर चढून चौथ्या स्थानावर पोहोचला आहे आणि ब्लॅक कॅप्सचा टी-20 आंतरराष्ट्रीय कर्णधार मिचेल सँटनरने आठ स्थानांची झेप घेत नवीनतम पुरूषांच्या गोलंदाजी क्रमवारीत कुलदीप यादवसोबत 23 वे स्थान मिळवले आहे. हे खेळाडू आगामी टी-20 विश्वचषकात आपापल्या संघांसाठी महत्त्वाची भूमिका बजावतील.