For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अभिषेक शर्माला दंड

06:33 AM Apr 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
अभिषेक शर्माला दंड
Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

Advertisement

2026 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी खेळविण्यात आलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्धच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा सलामीचा आक्रमक फलंदाज अभिषेक शर्माला आयपीएलच्या शिस्तपालन नियमाचा भंग केल्याबद्दल स्पर्धा आयोजकांनी दंड ठोठावला आहे. आता अभिषेक शर्माला सामना मानधनातील 25 टक्के रक्कम दंड म्हणून द्यावी लागणार असून त्याच्या नावावर एक डिमेरिट गुण जमा झाला आहे.

या सामन्यात अभिषेक शर्माने 21 चेंडूत 4 षटकार आणि 4 चौकारांसह 48 धावा झोडपल्या. हैदराबादच्या अभिषेक शर्माने आयपीएल स्पर्धेत 101 षटकार नोंदविण्याचा पराक्रम केला असून तो सर्वाधिक षटकार या स्पर्धेत नोंदविणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. डेव्हिड वॉर्नर 143 षटकारांसह पहिल्या स्थानावर आहे.

Advertisement

Advertisement

.