For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अभिषेक, चकवर्ती, पंड्या टी-20 क्रमवारीत अव्वल

06:43 AM Sep 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
अभिषेक  चकवर्ती  पंड्या टी 20 क्रमवारीत अव्वल
Advertisement

वृत्तसंस्था / दुबई

Advertisement

भारतीय अष्टपैलू हार्दिक पंड्या, फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती आणि आक्रमक सलामीवीर अभिषेक शर्मा या त्रिकुटाने बुधवारी जाहीर झालेल्या आयसीसी टी-20 क्रमवारीत आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे.

गेल्या आठवड्यात अव्वल क्रमांकाचा गोलंदाज बनलेल्या चक्रवर्तीने 14 रेटिंग गुणांसह आपले स्थान मजबूत केले आहे आणि तो 747 गुणांवर पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात 11 स्थानांनी झेप घेतल्यानंतर पाकिस्तानच्या अबरार अहमदने यावेळी 12 स्थानांची मोठी झेप घेतली आहे. गेल्या आठवड्यात फॉर्ममध्ये तात्पुरती घसरण झाल्यानंतर त्याची चार स्थानांची घसरण झाली होती. बांगलादेशचा अनुभवी टी-20 आंतरराष्ट्रीय वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान सहा स्थानांनी झेप घेत पुन्हा टॉप 10 मध्ये आला आहे. डावखुरा वेगवान गोलंदाजाने गेल्या दोन सामन्यांमध्ये 8 धावांच्या सरासरीने 6 बळी टिपले आहेत. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत आघाडीवर असलेल्या पंड्याने गोलंदाजीतही सहा स्थानांनी प्रगती केली आहे आणि तो 60 व्या स्थानावर पोहोचला आहे.

Advertisement

फलंदाजांमध्ये सलामीवीर अभिषेकने रेटिंग गुणांमध्ये वाढ केली आहे आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीतील अव्वल स्थानावर आपले स्थान कायम ठेवले आहे. आशिया चषकात भारताच्या शेवटच्या गट फेरीच्या सामन्यात त्याने ओमानविरुद्ध जलद 38 धावा केल्या आणि त्यानंतर रविवारी पाकिस्तानच्या 171 धावांचा पाठलाग करताना 74 धावा झोडपल्या. पाकिस्तानविरुद्ध 19 चेंडूत नाबाद 30 धावा करुन पाठलाग पूर्ण करण्यात मदत करणारा तिलक वर्मा एका स्थानाची प्रगती करीत तिसऱ्या स्थानावर पोहोचलमध्ये स्थान मिळविले.

त्याच सामन्यात 45 चेंडूत 58 धावा करुन पाकिस्तानला पुढे नेणारा साहिबजादा फरहान 31 स्थानांनी प्रगती करत 24 व्या स्थानावर पोहोचला. श्रीलंकेविरुद्ध पाकिस्तानला विजय मिळवून देणाऱ्या हुसेन तलतने झेप घेतली आणि पुरुषांच्या टी-20 फलंदाजांच्या क्रमवारीत संयुक्त 234 व्या स्थानावर पोहोचला. आणखी एक मोठी वाढ सैफ हसनची झाली. ज्याच्या 61 व्या स्थानामुळे आशिया कपमध्ये सुपर फोरमध्ये बांगलादेशला विजयी सुरूवात करण्यास मदत झाली होती. फलंदाजांच्या क्रमवारीत तो 133 स्थानांनी पुढे जावून 81 व्या स्थानावर पोहोचला.

Advertisement
Tags :

.