‘बी हॅप्पी’मध्ये अभिषेक अन् नोरा
अभिषेक बच्चन पुन्हा एकदा पिता-लेकीचे भावनिक अन् सुंदर बाँडिंग दर्शविण्यासाठी तयार आहे. त्याचा ‘बी हॅप्पी’ हा चित्रपट थेट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. यात इनायत वर्मा त्याच्या मुलीची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट पिता अन् मुलीच्या नात्याची मनस्पर्शी कहाणी दर्शविणारा आहे. अभिषेक अन् इनायतच्या या चित्रपटाचे पोस्टर जारी करण्यात आले आहे. हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर 14 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘बी हॅप्पी’ एक सिंगल पिता शिव (अभिषेक)ची कहाणी आहे, ज्याचे खोडकर मुलगी धरा (इनायत)सोबत अनोखे बॉन्डिंग असल्याचे यात दिसून येणार आहे. धराला देशातील सर्वात मोठ्या डान्स रियलिटी शोमध्ये परफॉर्म करण्याचे स्वप्न पूर्ण करायचे असते. यात एका व्हिलनची एंट्री होते, जो तिचे स्वप्न उधळून लावण्याची धमकी देतो. त्यानंतर शिव मुलीच्या स्वप्नाला पूर्ण करण्याचे मिशन हाती घेतो. या चित्रपटात अभिषेक, नोरा फतेही, इनायत वर्मा मुख्य भूमिकेत आहे. तर नासिर, जॉनी लिवर आणि हरलीन सेठी सहाय्यक भूमिकेत आहेत.