For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अभिनव गविसिद्धेश्वर स्वामीजी करणार यंदा म्हैसूर दसरोत्सवाचे उद्घाटन

06:32 AM Sep 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
अभिनव गविसिद्धेश्वर स्वामीजी करणार यंदा म्हैसूर दसरोत्सवाचे उद्घाटन
Advertisement

त. भा. प्रतिनिधी / बेंगळूर :

Advertisement

जगप्रसिद्ध म्हैसूर दसरोत्सवाचे उद्घाटन यंदा कोप्पळ येथील गविसिद्धेश्वर मठाचे अभिनव गविसिद्धेश्वर महास्वामी यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात अभिनव गविसिद्धेश्वर स्वामीजींना निमंत्रणपत्र पाठविले आहे तसेच त्यांच्याशी फोनवर चर्चाही केली आहे.

कोप्पळमधील गविमठाच्या स्वामीजींनी हे निमंत्रण स्वीकारल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या ऐतिसाहिक म्हैसूर दसरोत्सव होणार आहे. या पार्श्वभूमीवर उद्घाटन म्हणून स्वामीजींना 28 सप्टेंबर अधिकृतपणे निमंत्रण दिले जाणार आहे.

Advertisement

गविसिद्धेश्वर स्वामीजींनी दसरोत्सव उद्घाटनाला नकार दिल्याची अफवा शनिवारी पसरली होती. त्यावर कन्नड आणि सांस्कृतिक मंत्री शिवराज तंगडगी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. अभिनव गविसिद्धेश्वर स्वामीजींच्याच हस्ते म्हैसूर दसरा उत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यात कोणतीही शंका नाही. खोटे वृत्त पसरविणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. सोशल मीडियावर पसरवली जाणारी माहिती पूर्णपणे खोटी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Tags :

.