हाफ मॅरेथॉनमध्ये अभिनंदन, सृष्टी विजेते
खानापूर येथे रन फॉर नेचर स्पर्धा उत्साहात : जवळपास 600 हून अधिक स्पर्धकांचा सहभाग
खानापूर : खानापूर येथे मंगेता आइक्रीम व मिक्सड्राईव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रन फॉर नेचर’ हाफ मॅरेथॉन स्पर्धेतील 10 कि. मी. धावण्याच्या पुरुष व महिलांच्या गटात अभिनंदन दीपक व सृष्टी पाटील यांनी विजेतेपद पटकाविले. खानापूर येथे चौथ्या रन फॉर नेचर हाफ मॅरेथॉन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अमितकुमार शर्मा, इंद्रजित सिद्धनाळ, बसवराज जवळी, विनय बाळेकाई, नागन्ना होसमनी, रवी उप्पीन, डॉ. राधाकृष्ण हेरवाडकर, सुनील आपटेकर आदी मान्यवरांच्या हस्ते ध्वज उंचावून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. जवळपास 600 हून अधिक स्पर्धकांनी यामध्ये भाग घेतला होता. त्यामध्ये अबालवृद्धांचाही सहभाग लक्षणीय ठरला. 72 वर्षीय शिवकुमार वागळे यांनी ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली.
सविस्तर निकाल पुढील प्रमाणे
10 कि.मी. 34 वर्षांवरील पुरुष गट 1) अभिनंदन दीपक, 2) प्रधान केरुलकर, 3) महादेव कोळेकर, 35 ते 44 वर्षांवरील गट 1) परशराम भोई, 2)राहुल शिरसाट, 3) राजू पिरगन्नावर, 45 ते 54 वर्षांवरील गट 1) परशराम कुंदगी, 2) शिवलिंगाप्पा साताप्पा, 3) पवनकुमार, 55 ते 64 वर्षांवरील गटात 1)कल्लाप्पा तिरवीर, 2) राधाकृष्ण नायडू, 3) यशवंत परब, 65 वर्षांवरील गट 1) सुनील करवंडे, 2) शिवकुमार वागळे, 3) आनंद पाटील 10 कि.मी. 34 वर्षांवरील महिला गटात 1)सृष्टी पाटील, 2) क्रांती वेताळ, 3) सानिका हंगिरगेकर, 35 ते 44 वर्षांवरील गट 1) नेत्रा सुतार, 2) स्वप्ना चिटणीस, 3) अर्चना पांचाळ, 45 ते 54 वर्षांवरील गट 1) अनिता पाटील, 2) दीपा तेंडोलकर, 3) बिना फर्नांडीस, 55 ते 64 वर्षांवरील गटात 1) डॉ. सरोजा शिंदे, 65 वर्षांवरील गट 1) बी. सी. पर्वती, 2) परिमळा पाटील यांनी विजेतेपद पटकाविले. 5 कि. मी. धावण्याच्या स्पर्धेत 17 वर्षांखालील मुलांच्या गटात 1) अभिषेक माने, 2) ज्ञानदेव शिंदे, 3) शुभम केरुरकर, 18 वर्षांवरील गटात 1) प्रथमेश परमेकर, 2) भूवन सुयल, 3) सुरेश बाळेकुंद्री 5 कि. मी. धावण्याच्या स्पर्धेत 17 वर्षांखालील मुलींच्या गटात 1) प्रतीक्षा कुरबर, 2) प्रांजल धुमधुम, 3) सृष्टी नागेनट्टीकर, 18 वर्षांवरील गटात 1) दिव्या हेरेकर, 2) स्नेहल गोरल, 3) गितांजली वाडकर यांनी विजेतेपद पटकाविले.
प्रमुख पाहुणे अरुण होसमनी, जगदीश शिंदे, गुरुप्रसाद देसाई, कपिल गुरव आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पदके आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.