...तर पुन्हा आंदोलनाचा अभिजीत दीपकेंचा इशारा
विद्यार्थ्यांवरील गुन्हे तातडीने मागे घेण्याची मागणी
वृत्तसंस्था
नवी दिल्ली
‘कॉक्रोच जनता पार्टी’ने (सीजेपी) पुन्हा एकदा देशव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. पेपरफुटीच्या निषेधार्थ दाखल केलेल्या विद्यार्थ्यांविरुद्ध दाखल केलेले एफआयआर मागे घेण्याच्या आपल्या आश्वासनापासून केंद्र सरकार फिरत असल्याचा आरोप पक्षाने केला आहे. असे करण्यासाठी सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील निरीक्षणांवर अवलंबून असल्याचे ‘सीजेपी’चे म्हणणे आहे. ‘सीजेपी’चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी याबाबत सरकारला पुन्हा सतर्क केले आहे. जर विद्यार्थ्यांचा छळ थांबला नाही आणि त्यांच्याविरुद्ध दाखल केलेले खटले मागे घेतले नाहीत, तर ‘सीजेपी’ लवकरच पुन्हा रस्त्यावर उतरेल, असे ते म्हणाले.
20 जुलै रोजी विद्यार्थ्यांना पोलिसांच्या लाठीचार्जला आणि रक्तपाताला सामोरे जावे लागले होते. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पेपरफुटीच्या विरोधातील आंदोलनांशी संबंधित खटल्यांची सुनावणी करताना शांततापूर्ण आंदोलकांवर कोणतीही दंडात्मक कारवाई करू नये, असे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नसलेल्या आंदोलकांना सोडण्याचे आदेश दिले आहेत, तसेच यापूर्वी दाखल केलेल्या एफआयआरचा तपास सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.