For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पुणे आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर स्पर्धेत अभिजीत गुप्ता आघाडीवर

06:19 AM Jul 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
पुणे आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर स्पर्धेत अभिजीत गुप्ता आघाडीवर
Advertisement

वृत्तसंस्था/ पुणे

Advertisement

भारतीय ग्रँडमास्टर अभिजीत गुप्ता याने शुक्रवारी येथे सुरू असलेल्या ‘पुणे आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर राउंड रॉबिन बुद्धिबळ स्पर्धेच्या चौथ्या फेरीत बरोबरी साधली असली, तरी त्याने स्पर्धेत एकहाती आघाडी घेतली आहे. बेलारूसचा ग्रँडमास्टर अॅलेक्सी फेडोरोव्ह याने गुप्ताला बरोबरीवर रोखले. तरीही तीन गुणांसह गुप्ताने आपली आघाडी कायम राखली आहे. त्याच्या पाठोपाठ भारताचा ‘फिडे मास्टर‘  अद्विक अग्रवाल आणि अमेरिकेचा वैद्यनाथन कन्नन हे खेळाडू आहेत.

या दोघांचेही प्रत्येकी 2.5 गुण आहेत मात्र, चौथ्या फेरीपूर्वी भारतीय ग्रँडमास्टरसोबत संयुक्त आघाडीवर असलेल्या कन्ननला आपले अव्वल स्थान टिकवण्याची संधी साधता आली नाही. चौथ्या फेरीत बेलारूसच्या अॅलेक्सी अलेक्झांड्रोव्हने 13 वर्षीय कन्ननचा पराभव केला. इतर सामन्यांमध्ये, भारताचा ‘आंतरराष्ट्रीय मास्टर‘ कुशाग्र मोहन याने आपलाच देशबांधव आणि ‘आंतरराष्ट्रीय मास्टर‘ अक्षय बोरगावकर याच्याशी बरोबरी साधली, तर श्रीलंकेचा ‘आंतरराष्ट्रीय मास्टर‘ एल.एम.एस.टी. डी सिल्वा यानेही भारताचा ‘फिडे मास्टर‘ अद्विकसोबत सामना बरोबरीत सोडवला. दरम्यान, ‘आंतरराष्ट्रीय मास्टर‘ अश्वथ एस. याने ‘आंतरराष्ट्रीय मास्टर‘ नितीश बेलुरकरचा पराभव केला.

Advertisement

Advertisement
Tags :

.