For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अभयसिंगला पराभवाचा धक्का

06:08 AM Apr 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
अभयसिंगला पराभवाचा धक्का
Advertisement

वृत्तसंस्था, अल गौना (इजिप्त)

Advertisement

येथे सुरू असलेल्या अल गौना खुल्या स्क्वॅश स्पर्धेत पुरूष विभागातील दुसऱ्या फेरीतील सामन्यात इजिप्तच्या सातव्या मानांकीत युसुफ इब्राहीमने भारताच्या टॉपसिडेड अभय सिंगला पराभवाचा धक्का दिला.

दुसऱ्या फेरीतील या लढतीमध्ये इजिप्तचा सातवा मानांकीत युसूफ इब्राहीमने अभय सिंगचा 7-11, 11-9, 9-11, 11-5, 11-8 अशा पाच गेम्समधील लढतीत पराभव करत तिसरी फेरी गाठली. युसूफने हा सामना 68 मिनिटांत जिंकला. या स्पर्धेतील सलामीच्या लढतीत अभय सिंगने इजिप्तच्या इलेनीनचा 3-2 अशा गेम्समध्ये पराभव करुन दुसरी फेरी गाठली होती.

Advertisement

Advertisement
Tags :

.