For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अभयसिंग स्क्वॅश स्पर्धेत विजेता

07:15 AM Aug 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
अभयसिंग स्क्वॅश स्पर्धेत विजेता
Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

Advertisement

मलेशियातील निगेरी सेमबिलान येथे झालेल्या पीएसए चॅलेंजर टूरवरील 15 हजार अमेरिकन डॉलर्स बक्षीस रकमेच्या स्क्वॅश स्पर्धेचे विजेतेपद भारताच टॉप सिडेड स्क्वॅशपटू अभयसिंगने पटकाविले.

या स्पर्धेतील खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात टॉप सिडेड अभय सिंगने हाँगकाँगच्या तृतीय मानांकित हेन्री लेयुंगचा 11-7, 6-11, 3-11, 11-5, 12-10 अशा 5 गेम्समधील लढतीत पराभव करत विजेतेपद पटकाविले. जागतिक स्क्वॅशपटुंच्या मानांकनात अभयसिंग सध्या 24 व्या स्थानावर असून त्याचे पीएसए चॅलेंजर टूरवरील हे 13 वे विजेतेपद आहे. या स्पर्धेत अभयसिंगने उपांत्यफेरीच्या लढतीत मलेशियाच्या ए. चंद्रनचा तर उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत मलेशियाच्या मोहम्मद सैफिक कमलचा तर दुसऱ्या फेरीतील लढतीत लो वे सिरेनचा पराभव केला. या स्पर्धेत अभयसिंगला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली होती

Advertisement

Advertisement
Tags :

.